उरण (सुनिल ठाकूर ).
नेहरू युवा केंद्र रायगड -अलिबाग, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि वटवृक्ष सामजिक संस्था यांच्या वतिने आदर्श रक्तदाता पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आणि अशा दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आले. यावेळी भिंगार गावचे माजी सरपंच श्री अनिल लक्ष्मण वरे यांच्या कार्याची दखल घेत त्याना आदर्श रक्तदात रायगड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
सामाजिक कार्य सोबत रक्तदान ,वन्यजीव रक्षण , गिर्या रोहण.अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर असलेले युवा नेतृत्व म्हणून त्यांची पनवेल परिसरात ओळख आहे. त्याना मिळालेल्या या सन्माना मुळे त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.