कळंबुसरे गावातील जागूत शिव मंदिरासमोरील तलावातील गाळ काढण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते तथा कळंबुसरे गावचे माजी सरपंच सुशील राऊत यांनी स्वखर्चाने हाती घेतले आहे.सुशील राऊत यांच्या समाजाभिमुख कार्याबद्दल कळंबुसरे गावातील ग्रामस्थांनी, शिवभक्तांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
कळंबुसरे गावात प्राचीन काळातील जागूत शिव मंदिर आहे.या शिव मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम इंद्रायणी सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष सुरेशशेठ राऊत यांनी स्वखर्चाने हाती घेतले होते.अशा शिव मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक म्हणून शिवभक्त हे मंदिराजवळील तलावातील पाण्याचा वापर करत आहेत.अशा प्रवित्र तलावात गाळ साचून राहिल्याने सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत तसेच आपले वडील सुरेशशेठ राऊत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत कळंबुसरे गावाचे माजी सरपंच सुशील राऊत यांनी स्वखर्चाने सदर तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
कोट :
सुरेशशेठ राऊत यांनी इंद्रायणी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गोरं गरीबांच्या उन्नतीसाठी उरण, पनवेल,पेण परिसरात अनेक उपक्रम राबविले असून गावोगावच्या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे.तसेच चिरनेर गावातील जागूत श्री महागणपती देवस्थानला सोन्याचा मुकुट चढविला आहे.अशा दानशूर वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे सुपुत्र तथा माजी सरपंच सुशील राऊत यांनी स्वखर्चाने शिव मंदिराजवळील तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले अशा आहे.अशा होतकरू व्यक्तींचा आदर्श सर्वांनी घेऊन गावाच्या विकासासाठी योगदान दिले तर निश्चितच आप आपले गाव विकासाच्या दृष्टीने इतरांसमोर एक नवा इतिहास निर्माण करणार - मनोज पाटील - सामाजिक कार्यकर्ते उरण पुर्व विभाग