-->
आपला महाराष्ट्र 24

उलवे प्रांतात महापरिनिर्वाण दिनास अभिवादन



उलवे - 05 डिसेंबर मध्यरात्री आणि 06 डिसेंबर, बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था, उलवे नोड, संस्थेच्या माध्यमातून विश्वरत्न, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अभिवादन पर सभा एस. एन. जी. शाळेजवळ संकल्पित बुद्ध विहार जागेवर महापरिनिर्वाण दिनी उपस्थितीत झालेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण एक प्रामाणिक आणि स्वाभिमानी आंबेडकरवादी विचारी आहोत. क्रांतिकारी विचार बदल घडवून परिवर्तन करताना विचार हे प्रभावी गुण आहे. बाबासाहेबांचे विचार हे ऊर्जा देण्याचे कार्य करते व प्रेरणा देते. माणूस जागृत होतो. सामाजिक हितासाठी तो कार्य करत असतो म्हणून सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येक समाज घटकातील लोकांना कळेल ह्या साठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. बाबासाहेबांचे विचार प्रज्वलित केले पाहिजे त्यासाठी कार्य केले पाहिजे. सन्माननीय बौद्धाचार्य संतोष हाटे  आणि सन्माननीय बौद्धाचार्य विजय हबळे यांनी सुमधुर वाणीतून त्रिसरण पंचशील घेऊन बुद्ध पूजा व भीम स्तुती घेऊन कार्यक्रमास सुरुवात करून सभेस सूत्रसंचालन सन्माननिय संस्थेचे सचिव उपासक अशोक जाधव ह्यांनी विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अभिवादन करून अभिवादन सभेस उपस्थित उपासक आणि उपासिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपासक गवळे ह्यांनी महामानवास अभिवादन करून आपले विचार व्यक्त व संघटनेचे फौंडर मेंबर असून त्यांनी असे आव्हान केले की, समाज बांधव म्हणून सर्वांना एक विचाराने, एक मताने आपण सर्वांनी मिळून एकत्र आले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून सर्वांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे. आपले एकतेची साद उलवे शहरात दिसून आली पाहिजे. भारतीय संविधान आपली ओळख आहे. आणि भारतीय संविधान सुरक्षित केले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. सन्माननीय विश्वकांत लोकरे ह्यांनी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून, आपले विचार व्यक्त करत असताना, त्यांनी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्त्वाच्या दिनविशेष आढावा घेत बाबासाहेबांच्या सोबत लाखो अनुयायांनी नागपूर येथे घेतलेली बौद्ध धम्म दीक्षेचा कार्यक्रम ह्यावर प्रकाश देत 15 ऑक्टोबर 1956 ते 6 डिसेंबर 1956 ह्या कालावधीत बाबासाहेबांचे जीवनातील कार्याची माहिती देत, मार्मिकरीत्या संबोधित करता असता नेपाळ येथे आयोजित World Buddhist fellowship conference मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी "बुद्ध आणि काल मार्क्स" या शोध प्रबंधावर तंतोतंत विवेचन करत विचार व्यक्त केले. तथागत गौतम बुद्धांचा धम्म समतेवर आधारित असून त्यात प्रथम श्रेणी, दुय्यम श्रेणी असा प्रकार नाही. धम्म प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्राण्याला महत्त्व देते, समता देते, कम्युनिझम आणि बुद्धिझम यातले फरक दाखवून भगवान बुद्धांचा धम्म नैतिकतेने, प्रज्ञा, शिल व करुणा यावर आधारित आर्य अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता याबद्दल उजळणी करून तिथल्या उपस्थित बौद्ध भिख्खू जागतिक कीर्तीचे स्कॉलर यांना ते पटवून दिले. तेथील उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधींना हे जाणीव झाले की, बाबासाहेब खरेच ज्ञानी व्यक्तिमत्त्व आहे. तिथून त्यांना "बोधिसत्व" पदवी बहाल झाली. तसेच बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर परत 30 नोव्हेंबर 1956 ला दिल्लीत पोहचले. त्यानंतर सुद्धा कार्यक्रमास उपस्थित झाले. दिनांक 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 1956 ह्या सर्व घटनांची माहिती देत सारा सारांश दिल्ली ते नागपूर , नागपूर ते राजगृह, राजगृह ते चैत्यभूमी असे सर्व विवरण त्यांनी वर्णन केले. उपस्थितीत बांधव अतिशय भावूक झाले. तसेच लोकरे  सुद्धा बोलत असता गहिवरून गेले. त्यानंतर समाजसेविका जनशक्ती शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा उपासिका विनिताताई बरफे यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत देश आणि संविधान याबद्दल थोडक्यात माहिती दिली. संविधान जिवंत राहिले पाहिजे आणि त्याचे संरक्षण केले पाहिजे तरच ही लोकशाही टिकेल म्हणून आंबेडकरी समाजातील तमाम बंधू भगिनींनी लोकशाही आदर्श जिवंत ठेवण्यासाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे, भारतीय संविधान कार्य केले पाहिजे आणि विचार परिवर्तित केले पाहिजे
 तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त चार ओळी गीत गाऊन अभिवादन केले. तदनंतर संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मधुकर रगडे यांनी अभिवादन करत 6-डिसेंबर 1956 ची घटना सांगत त्यांचे थोरले भाऊ सुद्धा त्या महापरिनिर्वानांना उपस्थित होते. तिथली स्थितीचा आढावा सांगत आठवण करून दिली. त्यांचे बंधू कसे त्या महापरिनिर्वाण साठी पोहोचले याची माहिती दिली. व अशाप्रकारे उलवे परिसरातील सामाजिक संस्था कार्यकर्ते नेते व समाजसेवक शासकीय प्रशासकरी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाण दिनास भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.