-->
आपला महाराष्ट्र 24

वीर वाजेकर महाविद्यालयात मा. खा.शरदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताह सोहळ्याचे आयोजन.

उरण (सुनिल ठाकूर ) दिनांक-६/१२/२०२२ मा.खासदार शरदराव पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शरद पवार साहेब केवळ राजकारणी व्यक्तिमत्व नसून समाजभान असणारे व्यक्तिमत्व आहे.रयत शिक्षण संस्थेचे, अध्यक्ष म्हणून त्यांची ध्येय धोरणे नेहमीच महत्त्वाची असतात.रविवार दिनांक ४ डिसेंबर रोजी त्यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.पवार साहेबांची विज्ञान दृष्टी आणि रयतेचा विद्यार्थी म्हणून महाविद्यालयात ५ डिसेंबर रोजी रसायनशास्त्र विभागाने विज्ञान प्रदर्शन आयोजित केले.क्रीडा,समाजकारण, राजकारण, शिक्षण याबरोबरच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे,त्यानिमित्ताने 
मानसशास्त्र विभागाने यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर डॉ.बाळासाहेब पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.महाविद्यालय परिसर स्वच्छता म्हणून ७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या 
स्वयंसेवकांनी महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.पवार साहेबांनी महिला सबलीकरण या विषयावर अधिक भर दिला होता,दिनांक-८ डिसेंबर रोजी राज्यशास्त्र विभाग व महिला विकास कक्ष यांच्या विद्यमाने एकदिवसीय महिला सबलीकरण याविषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक-९ डिसेंबर रोजी प्राणिशास्त्र व हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.१० डिसेंबर रोजी रसायनशास्त्र विभाग आयोजित महिला स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पवार साहेब आणि राष्ट्रीय क्रीडा धोरण व अंमलबजावणी याविषयी त्यांची दूरदृष्टी पाहता साहेबांचे काम अत्यंत मौलिक असे आहे.दिनांक-११ डिसेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.१२ डिसेंबर रोजी मा.खासदार शरदराव पवार यांच्या चौफेर व्यक्तिमत्तावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत,ललित बाबर, तसेच नेमबाज सुमा शिरूर उपस्थित राहणार आहेत.रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.भगीरथशिंदे,रायगड विभागाचे चेअरमन मा.शिक्षक आमदार,बाळाराम पाटील,माजी खासदार मा.रामशेठ ठाकूर,मा.पी.जे.पाटील,
मा.सुधीर घरत,मा.भावणताई घाणेकर,चेअरमन डॉ.अनिल पाटील,सचिव,डॉ.विठ्ठल शिवणकर,माजी सचिव,डॉ.गणेश ठाकूर,रायगड विभागीय चेअरमन श्री.ठाकूर 
या संपूर्ण सप्ताहाचे आयोजन प्राचार्य,डॉ.पी.जी.पवार,
कार्याध्यक्ष,डॉ.संदीप घोडके व उपप्राचार्य, डॉ.विलास महाले यांनी केले,संपूर्ण नियोजनात डॉ.आमोद ठक्कर,उपप्राचार्य, उत्तमराव घोरपडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन प्रमुख श्री.दगडे,श्री.अविनाश पाटील तसेच सर्व कार्यालयीन सेवकांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.