उरण (सुनिल ठाकूर ).सालाबाद् प्रमाणे या वर्षी देखील श्री साई सेवा मंडळ उरण विभाग यांच्या वतीने श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री दत्त जयंती उत्सव निमित्त श्री साई बाबांचा भव्य पायी पालखी वारकारी दिंडी पदयात्रा श्री दत्त मंदिर उरण येथून सोमवार 28 नोहेम्बर् 2022 सकाळी 6 वाजता श्रींची आरती करून श्री क्षेत्र शिर्डी येथे प्रस्थान झाले असून पालखी दिंडी मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 20022 रोजी सकाळी 10 वाजतां श्री क्षेत्र शिर्डी येथे पोह्चेल.
सकाळी दत्त मंदिर उरण येथून
निघल्यावर पायी पालखी दिंडी
चे उरण शहरातून फाटक्याच्या आतिष बाजीने जोरदार स्वागत करण्यात आले .
पायी पालखी दिंडी
दास्तान फाटा येथे पोह्चल्यावर
: पायी पालखी दिंडीचे ओम साई मित्र मंडळ चिर्ले च्या वतीने श्री नीलकंठ घरत यांनी जोरदार स्वागत केले .तसेच यावेळी गोपीनाथ म्हात्रे .तेजस पाटील .शंकर म्हात्रे यांच्या कडून पद यात्रीना चहा,नास्ता,पानी. व लाडु देण्यात आले .तसेच जासई येथे बळीराम घरत .शशिकांत घरत याच्या कडून.चहा फरसाण.देण्यांत आले.तसेच जासई येथे पट्रोल पंम्प येथे दिंडीचे सरपंचं श्री संतोष घरत व गुरुनाथ घरत यांनी स्वागत करुन चहा नाश्ता देण्यांत आला
दुपारी पायी पालखी दिंडी मध्यान्ह आरती करितां साई मंदिर वहाल येथे पोचल्यावर पालखी दिंडीचे साई देवस्थान च्या वतीने देवस्थान चे अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील, सौ.पार्वती ताई पाटील .श्री जगन शेठ पाटील येथील जोरदार स्वागत केले .यावेळी साई देवस्थान च्या वतीने महा प्रसाद देण्यांत आला .यावेळी पद यांत्री साठी सौ.सुप्रिया घरत .तसेच दिगंबर कोळी यांचा भजन.रुपी कार्यक्रम पार पडला.तसेच यावेळी देवस्थान च्या वतीने श्री साई सेवा मंडळ दिंडीचे पदाधिकारी यांना सन्मानित करण्यात आले .तसेच यावेळी श्री साई सेवा .मंडळ दिंडी च्या वतीने देवस्था चे अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील यांचा सत्कार करण्यात आला .या नंतर दुपारी चहा घेऊन पायी पालखी दिंडी चे शिर्डी च्या दिशेने प्रस्थान झाले.