-->
आपला महाराष्ट्र 24

दिघोडे येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

उरण (सुनिल ठाकूर ). दिघोडे  हनुमान मंदिर येथे मिती मार्गशिर्ष शु. ४ रविवार दिनांक २७/११/२022 ते मार्गशिर्ष शु.८ गुरुवार दि. ०1/१२/२०2२ या कालावधीत  श्रीमत परमहंस जीवनमुक्त स्वामी महाराज, श्रीमत् परमहंस परमानंद स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु गोपाळकाका महाराज, श्री समर्थ सद्गुरु नामदेव बाबा महाराज, श्री समर्थ सद्गुरु एकनाथ महाराज, श्री समर्थ घनश्याम महाराज, श्री समर्थ धावजी महाराज, श्री समर्थ राजाराम महाराज, श्री समर्थ गजानन महाराज, श्री समर्थ सद्गुरु नागाबाबा महाराज, श्री समर्थ सद्गुरु जगनाथ महाराज ह.भ.प.गोपाळ महाराज,  , . , श्री समर्थ मधुकर महाराज, श्री समर्थ सद्गुरू गोविंद महाराज यांच्या कृपाशिर्वादाने श्री महंत रामकृष्ण चैतन्य महाराज परत यांच्या नेतृत्वा खाली भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते 
रविवार दिनांक 27/11/2022 सकाळी 7ते 8 श्री समर्थ गोविंद बाबा वहाळकर यांच्या हस्ते मंगल कलश पूजन. ह.भ.प.रामचंद्र बुवा घरत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, ह.भ.प. एकनाथ महाराज कंठवली यांच्या हस्ते ध्वजारोहण., ह.भ.प. गोपीनाथ महाराज जासई यांच्या हस्ते विणा पूजन, महंत रामकृष्ण महाराज यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी पूजन, व्यासपीठ चालक ह.भ.प.गुरुवर्य गोविंद बाबा महाराज, ह.भ.प.एकनाथ महाराज कंठवली, ह.भ.प. गोपीनाथ महाराज तर विणेकरी ह. भं. प. बाळाराम महाराज, हभप पांडुरंग महाराज, हभप रामचंद्र महाराज, हभप नारायण घरत, हभप अक्षय महाराज. 
या वेळी पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7 ते 12.30 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 3 ते 5 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 6 वाजता हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन. या मध्ये हभप मनोज महाराज (बेलपाडा ),हभप एकनाथ महाराज (कंठवली ),हभप रामकृष्ण महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन सोहळा संपन्न झाला. तर या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता दिनांक 1//12/2022 रोजी हभप जगदीश महाराज जोशी (त्यंबकेश्वर. )यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. 

.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.