-->
आपला महाराष्ट्र 24

सप्तसूत्री कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यावर जातीचे दाखल्यांचे वाटप


उरण (सुनिल ठाकूर )- मान. कोंकण विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ महेंद्र कल्याणकर, उप विभागीय अधिकारी पनवेल श्री राहुल मुंडके, तहसीलदार पनवेल श्री विजय तळेकर पनवेल यांच्या मार्गदरशनाखाली आणि उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजा साठी राबविण्यात आलेल्या सप्त सुट्टी कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील वाकडी कातकरी वाडी, हरीग्राम कातकरी वाडी, लहूची कातकरी वाडी, आखाडा कातकरी वाडी, कोरळ वाडी, बानू बाईची वाडी अश्या अनेक वाड्यावर जातीचे दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उरण सामाजिक संस्था उरण उपाध्यक्ष  प्रा. राजेंद मढवी. सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, रत्नाकर घरत, शेखर कानडे आणि रायगड भूषण दत्ता गोंधळी यांच्या हस्ते सदरहू दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.