उरण (सुनिल ठाकूर )
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2021 हा नामांकित पुरस्कार उरणचे सुपुत्र विजय भोईर (जिल्हा परिषद सदस्य शिवसेना)व विकास भोईर ब्लू स्टार सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस ( प्रोप्रायटर )यांना मिळाला आहे.रायगड जिल्ह्यात केलेल्या विविध सामाजिक कार्याबद्दल राज्याचे महामहिम राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य भवनावर दोघां भावांना एकाच वेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना विजय भोईर, विकास भोईर यांनी सांगितले की हा सर्वोत्कृष्ट सन्मान आपला सर्वांचा असून ज्यांनी आम्हा दोघा भावंडांना उत्तुंग प्रेम केले त्यांचा आहे व हा सन्मान आम्हा दोघा बंधूंचा नसून आमच्या वरती प्रेम करणारे त्या प्रत्येक घटकाचा आहे.हा सन्मान समाजातील त्या प्रत्येक चांगल्या घटकांच्या चरणी समर्पित होवो ही श्रीचरणी प्रार्थना.जनतेचे आशीर्वादरुपी पाठबळ हे प्रत्येक वेळी आमच्या दोघा जुळ्या बंधूंच्या पाठीशी उभे राहील हीच श्रीचरणी प्रार्थना करतो असे सांगत विजय भोईर व विकास भोईर या दोघ्या जुळ्या भावंडानी आयोजकांचे, राजमाता कल्पनाराजे भोसले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी व सर्व जनतेचे आभार मानले.जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर व उद्योजक विकास भोईर यांना राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
