उरण ( सुनिल ठाकूर )
महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे.या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे.एन.पी.टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे.न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.
या गावातील गावदेवीची यात्रा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष रविवार दि.१७ एप्रिल व सोमवार दिनांक 18 एप्रिल २०२२ या दोन दिवसात मोठ्या उत्साहात गावकर्यांनी संपन्न केली . कोरोना नंतर प्रथमच धूमधडाक्यात व भक्तीपूर्ण वातावरणात सर्व भक्तांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले .तसेच पालखी सोहळा सोमवार दि.१८ एप्रिल २०२२ रोजी भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला सदर गावचे सुपुत्र रोशन घरत याने गावचे सुप्रसिध्द गितकार , संगितकार , नृत्य दिग्दर्शक कै. अनंता बुवा यांची सुंदर रंगावली रेखाटून गावकर्यांच्या भावना वआठवणींना उजाळा दिला. तसेच वैभव कटावते यानेही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व देवीचे सुंदर शिल्प रेखाटून मानवंदना दिली . सदर रंगावली व शिल्पाचे समस्त गावकर्यांनी भरभरून कौतुक केले आहे.गावामधील ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती. सरपंच-हरिचंद्र म्हात्रे ,न्हावा गावातील ग्राम सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. शैलेश विठ्ठल पाटील,उपअध्यक्ष जयेंद्र पाटील,चेतन कडू, मोरेश्वर पाटील खजिनदार-गणेश भोईर ,सहखजिनदार-अनंत म्हात्रे, अक्षय ठाकूर, सुरेश म्हात्रे तसेच इत्यादी पदाधिकऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई,ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते.गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे.ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात.गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहून भक्तांना आरोग्य सुख शांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक दामू भोईर यांनी माहिती देताना सांगितले.

