- “बेस्ट परफॉर्मंन्स” किताब मिळवून महाराष्ट्रची वाढविली शान
उरण (सुनिल ठाकूर )
कर्नाटक येथे 9 ते 11 एप्रिल 2022 मध्ये साजरा झालेल्या लोककला महोत्सव-22 मध्ये पुन्हा एकदा “बेस्ट परफॉर्मंन्स”हा प्रथम क्रमांकाचा किताब मिळवून हॅटट्रिक साधून दत्ता भोईर आणि त्यांच्या समुहाने महाराष्ट्र राज्याचे नाव उज्वल केले असल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भेंडखळ गावाचे सुपुत्र दत्ता भोईर आणि त्यांच्या कलाकार समूहांला या मोहोत्सवात कोळी व लावणी ही लोककला सादरकरण्या साठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली होती.या स्पर्धेत संपूर्ण देशांतून 25 राज्यांनी सहभाग घेतला होता.
कर्नाटक उडपी येथे “दक्षीण कन्नडा मोगवीरा महासंघ उडपी यांच्या वतीने महालक्ष्मी उत्सव इंटर झोनल लोककला मोह्त्स्व-2022 आयोजित करण्यात आला होता.अखंड भारता मधून 25 राज्यानी या महोत्सवात सहभाग घेतला होता.महाराष्ट्राच्या वतीने “नाखवा माझा दर्याचा राजा” या कार्यकमांतर्गत कोळी व लावणी नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले होते. “बेस्ट परफॉर्मंन्स”हा प्रथम क्रमांकाचा किताब “नाखवा माझा दर्याचा” समुहाने मिळवून हॅटट्रिक साधली आहे.
महोत्सवाच्या अंतिम दिवशी या कार्यक्रमाच्या समारोहा साठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसराज बोम्मई उपस्थित होते.याप्रसंगी आपले मार्गदर्शनपर विचार मांडताना कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसराज बोम्मई म्हणाले 25 राज्यांनी आपआपली पारंपारिक लोककला सादर केल्या परंतु , सादर करणाऱ्या कलाकारांनी आपापल्यापरीने सुंदर अविष्कार सादर केले असले तरी महाराष्ट्राने सादर केलेले कोळी व लावणी नृत्याविष्कार हा या महोत्सवातील “बेस्ट परफॉर्मंन्स” ठरला असल्याने मी त्या समुहाचे सर्वप्रथम कौतुक करून त्यांना शुभेच्छादेतो.असे कर्नाटक उडपी येथे “दक्षीण कन्नडा मोगवीरा महासंघ उडपी यांच्या वतीने महालक्ष्मी उत्सव इंटर झोनल लोककला मोह्त्स्व-2022 आयोजित प्रसंगी आपलेमार्गदर्शन पर विचार मांडताना म्हणाले.
समारोहाच्या शेवटी विजेत्या समूहाला सन्मानित करण्यात आले.



