उरण (सुनिल ठाकूर ).
महाराष्ट्र राज्य नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ डी. एल कराड , श्री. रामगोपाल मिश्रा, श्री. डि पी शिंदे, ॲड सुरेश ठाकूर आणि अँड सुनील वाळूजकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच मार्गदर्शनाखाली संघर्ष समितीचे राज्याचे मुख्य संघटक संतोष पवार यांनी आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मा श्री महेश पाठक साहेब यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील कामगार कर्मचारी यांच्या विविध न्याय्य मागण्या बाबत निवेदन दिले व संघर्ष समिती ने केलेल्या मागण्या मान्य करुन सन्मान पूर्वक योग्य तोडगा निघण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन स्तरावर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात यावे अन्यथा कोणत्याही परिस्थितीत दि. २ मे 2022 पासून महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याबाबत चर्चा केली त्यावेळी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव मा. महेश पाठक यांनी लवकरात लवकर आपल्या मागण्या बाबत बैठक आयोजन करण्यात येईल असे आश्वासन देऊन ज्यादिवशी मा आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय वरळी यांनी आपल्या संघर्ष समितीस चर्चेसाठी दि. २२ एप्रिल 022 ला बोलावले आहे त्याच दिवशी मंत्रालयीन स्तरावर ही आपली बैठक घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत त्यांनी आश्वासन दिले आहे.
त्यामुळे आपल्या मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत आपले 2 मे 2022 पासून चे बेमुदत काम बंद आंदोलन होणारच आहे
तरी संघटनेचे निमंत्रक व मुख्य संघटक जो पर्यंत कोणताही निर्णय अधिकृतरित्या आपणास कळवत नाहीत तो पर्यंत आंदोलनाची तयारी युद्ध पातळीवर चालूच ठेवणे आवश्यक आहे
तरी संघर्ष समिती चे सर्व कामगार नेते अध्यक्ष व पदाधिकारी यांनी आंदोलनाची तयारी जोरात करावी ही विनंती
