उरण: सुनिल ठाकूर
गरोडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर लर्निंग, मुंबई (GICLM) भारतातील आघाडीच्या IB आणि कैंब्रिज आंतरराष्ट्रीय शाळांपैकी एक आपले नवीन अर्ली इयर्स विंग सुरू करत आहे. हे उद्घाटन बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.
हे केंद्र लहान मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीत नवे परिवर्तन घडवणार आहे. फिनलंडच्या जागतिक प्रसिद्ध शिक्षण पद्धतीवर आधारित हा उपक्रम आहे जिथे खेळ, सर्जनशीलता आणि आनंदातून शिक्षण दिले जाईल.
परंपरेतून भविष्याकडे
सुमारे सहा दशकांपूर्वी श्रीमती परमेश्वरी गरोडिया यांनी गरोडिया एज्युकेशन ग्रुपची स्थापना केली. त्यांचा विश्वास होता की शिक्षण केवळ बुद्धीचे नव्हे, तर मन आणि हृदयाचे घडवणारे असावे. या तत्त्वावर आधारित गरोडिया संस्था आजही उत्कृष्टता, करुणा आणि नवनिर्मितीचे प्रतीक आहे.
आज या संस्थेचे नेतृत्व श्री निशांत गरोडिया, व्यवस्थापकीय संचालक (Managing Director, GICLM) करत आहेत. त्यांचे मत आहे की
"मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे शाळेची तयारी नसून, आयुष्याची तयारी असतात."
या विचारातूनच GICLM च्या नव्या अर्ली इयर्स विंग ची निर्मिती झाली आहे
शिकण्यातून आनंद:
नवीन इमारत म्हणजे फक्त इमारत नाही ती खेळ, कल्पनाशक्ती आणि शोधयात्रा यांचे जिवंत स्थान आहे.
प्रत्येक कोपरा - प्रकाशमय वर्ग, खुली शिक्षण जागा, संवेदनांना स्पर्श करणारे कोपरे आणि नैसर्गिक खेळाचे क्षेत्र मुलांना प्रश्न विचारायला, पुढाकार घ्यायला आणि आश्चर्याने जग पाहायला प्रोत्साहित करतो.
फिनलंडच्या बालकेंद्रित पद्धतीवर आधारित हा कार्यक्रम भावनिक विकास, सर्जनशीलता आणि अनुभवातून शिकणे या गोष्टींवर भर देतो.
यातून २१व्या शतकातील आवश्यक गुण आत्मविश्वास, सहानुभूती, सहकार्य, आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होतात.
नव्या शिक्षणयुगाचा प्रारंभ
१४ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी या नवीन विभागाचे उद्घाटन
GICLM कॅम्पस, घाटकोपर (पूर्व) येथे संपन्न झाले.
सदर कार्यक्रमास आमदार पराग शहा सह शिक्षण, बालविकास, कला आणि डिझाईन क्षेत्रातील मान्यवर अतिथी उपस्थित होते.या कार्यक्रमात रिबन-कटिंग, दिव्यांचा समारंभ, नवीन इमारतीचे दर्शन, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कामांचे प्रदर्शन आणि सादरीकरण असे उपक्रम झाले.
ही फक्त नवीन इमारतीची सुरुवात नाही तर आनंद आणि उत्सुकतेवर आधारित शिक्षण तत्त्वज्ञानाची सुरुवात आहे.
GICLM बद्दल
GICLM ही संस्था गरोडिया एज्युकेशन ग्रुप चा भाग आहे, जी गेली ६० वर्षे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
शाळेत शिक्षणाच्या पुढील टप्पे आहेत -
अर्ली इयर्सः फिनलंड पद्धतीवर आधारित खेळातून शिकणे आणि भावनिक विकास
प्रायमरी इयर्सः आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम (IPC) - चौकसपणा, सहानुभूती आणि जागतिक दृष्टीकोन विकसित करणे
सेकंडरी इयर्स: केंब्रिज अभ्यासक्रम सखोल ज्ञान, नवकल्पना, आणि चिंतनशील विचार
सीनियर इयर्स (IBDP): स्वावलंबन, संशोधन आणि नेतृत्व गुण वाढवणारा कठोर पण विचारशील कार्यक्रम
आधुनिक सुविधा
इनोव्हेशन लॅब्स, क्रिएटिव्ह स्टुडिओ, कला आणि संगीत कक्ष, तसेच सहकार्यात्मक शिक्षण
क्षेत्र - या सर्वामुळे GICLM ही अशी शाळा बनली आहे जिथे
शिकणे म्हणजे स्पर्धा नाही, तर आयुष्यभर चालणारा शोध आणि अनुभव आहे.