उरण : सुनिल ठाकूर
दिघोडे गावचे सरपंच श्री कीर्तिनिधी हसुराम ठाकूर तसेच एम. आय. डी. सी. चे सेवा निवृत्त प्रादेक्षिक अधिकारी श्री वर्षकेतू हसुराम ठाकूर यांच्या मातोश्री कै. कुसुम हसुराम ठाकूर यांचे नुकताच दिनांक 6/10/2025 रोजी अल्पशा आजाराने दु :खद निधन झाले.
कै. कुसुम ठाकूर ह्या प्रेमळ, शांत मनमिळाऊ स्वभावा च्या सर्वांच्या परिचित होत्या. त्यांच्या अंत्यविधी वेळेस मोठा जनसमुदाय जमला होता. त्यांच्या पश्यात त्यांना दोन मुले. एक मुलगी. सुना, जावई. नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक 15/10/2025 रोजी चिरनेर भोम खाडी येथे करण्यात येणार आहे. होम विधी गुरुवार दिनांक 16/10/2025 रोजी सकाळी 8.30 वाजता राहत्या घरी दिघोडे येथील राहत्या घरी होणार आहे. तर उत्तर क्रिया विधी गुरुवार दिनांक 16/10/2025 रोजी दिघोडे येथील राहत्या घरी होणार आहे.