उरण : सुनिल ठाकूर
नवरात्र हा भक्ती, नृत्य आणि उत्सवाचा सण आहे. अनेकजण या दिवसांत उपवासाची परंपरा पाळतात. परंपरा न मोडता तुम्ही आस्वादू घेऊ शकाल अशा शुद्ध आणि साध्या घटकांनी तयार केलेली स्वादिष्ट आईसक्रीम्स सादर करत यावर्षी एनआयसी आईसक्रीम्स तुमच्या उपवासाच्या दिवसांना त्यांच्या उपवास-फ्रेंडली फ्लेवर्ससह खास बनवत आहे.
उत्सवाची भावना मनापासून जपत एनआयसीची उपवास-फ्रेंडली आईसक्रीम्स दूध, साखर, फळे आणि सुका मेवा असे केवळ उत्तम दर्जाचे घटक वापरून तयार केली गेली आहेत. त्यामुळे शुद्धता, अस्सलपणा आणि भक्तीच्या भावनेला साजेशी चव मिळते. या श्रेणीत ताजेतवाने फळांचे फ्लेवर्स आहेत. त्यामध्ये टेंडर कोकोनट, सिताफळ, स्ट्रॉबेरी आणि मॅंगो तसेच रोस्टेड आल्मंड, अंजीर आणि केशर पिस्ता यांसारखे समृद्ध शाही सुका मेव्याचे फ्लेवर्स यांचा समावेश आहे. प्रत्येक फ्लेवर उपवासाच्या काळाला अनुरूप ठेवून निवडला गेला असून उत्सवाला गोडवा देतो.
नवरात्री म्हणजे एकत्र येणे आणि छान, गोड आठवणी बनवणे. संध्याकाळच्या आरतीनंतर कुटुंबासोबत टेंडर कोकोनट आईसक्रीमचा आनंद घेणे, आई-वडिलांसोबत सिताफळ आईसक्रीमचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा देणे किंवा उत्सवी गाठीभेटीचा आनंद केशर पिस्ताच्या समृद्ध चवीने साजरा करणे याची कल्पना करा. अशा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांनी कुटुंब जवळ येते आणि एनआयसी आईसक्रीम्सना या क्षणांचा भाग होण्याची इच्छा आहे.
सर्व एनआयसी आउटलेट्समध्ये तसेच इंस्टामार्ट, झेप्टो, आणि ब्लिंकिट सारख्या क्विक-कॉमर्स अॅप्सवर हे उपवास-फ्रेंडली फ्लेवर्स सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत फक्त उपवासच करू नका तर एनआयसी आईसक्रीम्ससोबत भक्ती, गोडवा आणि एकत्रितपणाही साजरा करा.