उरण: सुनिल ठाकूर
१६ वी एशियन शूटिंग चॅम्पियनशिप २०२५ कझाकिस्तान येथे दि. २५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आल्या. या शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय फुंडे उरण, महाविद्यालयातील एफ.वाय बी.एस.सी.आय.टी. ची कुमारी अवनी अलंकार कोळी या विद्यार्थिनीने भारताचे नेतृत्व करत वैयक्तिक तृतीय क्रमांक तर संघाला द्वितीय क्रमांक मिळवून दिला आहे.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. बाळाराम पाटील, श्री. सुधीर घरत, सौ. भावना घाणेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक आणि जिमखाना प्रमुख श्री. देवेंद्र कांबळे व सर्व जिमखाना सदस्य यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले