उरण : सुनिल ठाकूर
*आज गणेशोस्तव व ईद च्या पूर्व संध्येला उरण पोलीस ठाणे हद्दीत उरण पोलिसांचे रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते .
सदरचा रूट मार्च हा उरण पोलीस ठाणे येथून सुरू होऊन बक्षी कॉम्प्लेक्स- राजपाल नाका- गांधी पुतळा समोरून स्वामी विवेकानंद चौक- NI हायस्कूल- कामठा रोडने पालवी हॉस्पिटल- बालाजी दर्ग्या समोरून उरण बाजार पेठ मार्गाने उरण पोलीस ठाणे येथे समाप्त करण्यात आला.
सदर रूट मार्च वेळी उरण पोलीस ठाणे कडील पोनि (गुन्हे) श्री.काटवाणी, 2 सपोनि/पोउपनि, 22 पोलीस अंमलदार उपस्थित होते.