उरण: सुनिल ठाकूर
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुणे आयोजित 'कसबा पुरस्कार २०२५' हा सोहळा आज उत्साह आणि भक्तिभावाने संपन्न झाला. विविध क्षेत्रांमध्ये अविरत साधना, श्रम व समर्पणाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुणेकरांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
उत्सव मंडपामध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या शुभहस्से पुरस्कारांचे वितरण झाले.
२०२५ चे पुरस्कारप्राप्त मान्सवरः
क्रीडाः नंदन बाळ- भारतीय टेनिस प्रशिक्षक आणि माजी खेळाडू
उद्योगः इंद्रनील चितळे मॅनेजिंग पार्टनर, चितळे ग्रुप
वैद्यकीय सेवाः डॉ. संजीव डोळे जेष्ठ होमियोपॅथिक तज्ज्ञ
धर्म अन अध्यात्मः वेदमूर्ती धनंजय घाटे
शिक्षणः डॉ. विश्वजित कदम- कार्यवाह, भारती विद्यापीठ व प्र-कुलगुरू, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे
ऍड. प्रकाश त्र्यंबक दिघे जेष्ठ विधिज्ञ (कै. ऍड. भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार)
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे म्हणाले, "कसबा पुरस्कार' हा केवळ सन्मान नसून, पुण्यातील कार्यसमर्पित व्यक्तींनी जोपासलेल्या साधना, परिश्रम आणि निष्ठेचा गौरव आहे. हा पुरस्कार समाजातील ऐक्य, प्रेरणा आणि सकारात्मकता दृढ करणारा आहे."
ग्रामदैवत श्री कसबा गणपती हे पुण्याचे आध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे प्रतीक असून, या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांची 'माझ्या मोरयाचा धर्म जागों' ही ध्येयवाणी समाजमनात अधिक दृढ होत असल्याचे उपस्थित मान्प्रवरांनी व्यक्त केले.
कसबा पुरस्कार २०२५ च्या या प्रेरणादायी सोहळ्याने पुणेकरांच्या कार्यनिष्ठेला नवी ऊर्जा दिली असून, समाजासाठी निःस्वार्थ कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव सर्वांच्या मनात आदर निर्माण करणारा ठरला.