-->
आपला महाराष्ट्र 24

टाईप १ मधुमेह असलेल्या रुग्णावर यशस्वीरित्या पॅनक्रियाज-किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया.~ नानावटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये झाली शस्त्रक्रिया; रुग्णाची इन्शुलिन इंजेक्शन्स आणि डायलिसिसपासून सुटका ~


उरण:सुनिल ठाकूर
 नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी २५ वर्षांच्या ऋषी शर्माला नवसंजीवनी दिली आहे. कोलकात्यातील हा विद्यार्थी तीन वर्षांपासून टाईप १ मधुमेहाने त्रस्त आहे. त्यांच्यावर सायमल्टेनियस पॅनक्रियाज-किडनी ट्रान्सप्लान्ट यशस्वीपणे केले गेले, ज्यामुळे त्यांना आयुष्यभराच्या इन्शुलिन इंजेक्शन्स आणि डायलिसिसपासून सुटका मिळाली.

मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रेनल ट्रान्सप्लान्ट मेडिसिनचे चीफ कन्सल्टन्ट आणि नेफ्रॉलॉजीचे सिनियर डायरेक्टर, डॉ जतीन कोठारी व लिव्हर आणि मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लान्टचे डायरेक्टर डॉ गौरव चौबळ यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या एका मल्टी-डिसिप्लिनरी टीमने तब्बल चार तास ही गुंतागुंतीची सर्जरी केली.

ऋषीला लहानपणापासून अनेक इन्शुलिन इंजेक्शन्सवर अवलंबून राहावे लागत होते. अनियंत्रित मधुमेहामुळे सतत वेगवेगळी गुंतागुंत होत होती, डोळ्यांचे नुकसान, विकासात अडथळे आणि जवळपास तीन वर्षांपूर्वी सर्वात शेवटच्या स्तराचे किडनी फेल्युअर यामुळे त्याला पूर्णपणे डायलिसिसवर अवलंबून राहावे लागत होते. डायलिसिस केले जात असून देखील त्याच्या तब्येतीमध्ये सातत्याने घसरण होत होती आणि त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी नानावटी मॅक्स हॉस्पिटलशी संपर्क केला.

सखोल तपासणी केल्यावर असे लक्षात आले की निरोगी आयुष्य जगू शकण्यासाठी त्याला सायमल्टेनियस पॅनक्रियाज आणि किडनी ट्रान्सप्लान्टची गरज आहे. त्याला अवयव प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीमध्ये रजिस्टर करण्यात आले, सहा महिन्यांनंतर त्याला सर्जरीसाठी कॉल आला. मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे नानावटी मॅक्स हॉस्पिटलमधील एका ४१ वर्षीय रुग्णाला ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते, या रुग्णाने मृत्यूपश्चात केलेल्या अवयव प्रत्यारोपणानुसार त्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी काढण्यात आले. हे अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य असल्याचे आढळून आल्याने मृत रुग्णाच्या कुटुंबियांनी ते दान करण्यास अनुमती दिली. पॅनक्रियाज, किडनी, लिव्हर आणि हृदय दान करण्यात आले. किडनी आणि पॅनक्रियाज या दोन्हीसाठी ऋषी योग्य मॅच असल्याचे आढळून आले.

*मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रेनल ट्रान्सप्लान्ट मेडिसिनचे चीफ कन्सल्टन्ट आणि नेफ्रॉलॉजीचे सिनियर डायरेक्टर, डॉ जतीन कोठारी यांनी सांगितले,* "मधुमेहामुळे किडनी फेल्युअर झालेला प्रत्येक व्यक्ती या सायमल्टेनियस प्रक्रियेसाठी पात्र ठरतोच असे नाही. इन्शुलिनवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या टाईप १ मधुमेहाच्या ज्या रुग्णांना शेवटच्या टप्प्यातील किडनी आजार झाला आहे, फक्त त्यांनाच पॅनक्रियाज किडनी ट्रान्सप्लान्ट करून घेण्याचा सल्ला दिला जातो. हे दोन्ही अवयव एकत्र ट्रान्सप्लान्ट करून आम्हाला त्याच्या किडनी फेल्युअरवर उपचार करता आले, त्याबरोबरीनेच रूट मेटॅबोलिक चूक देखील दुरुस्त करता आली, त्यामुळे त्याची इन्शुलिनवर अवलंबून राहावे लागण्यापासून सुटका झाली. ही सर्जरी तब्बल चार तास चालली, ऑपरेशननंतर २१ दिवसांनी रुग्णाला घरी पाठवण्यात आले."

*मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील लिव्हर आणि मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लान्टचे डायरेक्टर डॉ गौरव चौबळ यांनी सांगितले,* "अतिशय दुःखात असताना देखील मृत रुग्णाच्या कुटुंबाने आपल्या प्रिय व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे शेवटच्या टप्प्यातील अवयव फेल्युअरशी झुंझत असलेल्या चार व्यक्तींना नवजीवन प्रदान केले. सखोल अनुभव, तंत्रज्ञान आणि क्लिनिकल प्रशासन यांनी सुसज्ज असलेली सेंटर्स असलेला मृत-दाता प्रोग्राम किती महत्त्वाचा आहे हे या केसमधून दिसून येते. आमच्या हॉस्पिटलमध्ये या सर्व गोष्टी आहेत."

नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेवटच्या टप्प्यातील आजारांनी त्रस्त रूग्णांसाठी मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लान्ट प्रोग्राम यशस्वीपणे राबवत आहे. भारतभरातील रुग्णांसाठी प्रगत ट्रान्सप्लान्ट देखभाल पुरवण्यासाठी हे हॉस्पिटल वचनबद्ध आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.