नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने कंबर कसली आहे. विमानतळ युद्धपातळीवर प्रकल्पात काम सुरू आहे. मात्र सध्या या विमानतळ प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी संपादित झाल्यात अशा प्रकल्पग्रस्तांचा एक गट मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात असून त्यांनी रविवारी पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरील नांदगाव टेकडीवर चढाई करून सरकारला हाक मारण्याचे अनोखे आंदोलन केले. प्रकल्पग्रस्त तरुणांनी वेगळा गट करून आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे यापूर्वीच्या प्रकल्पग्रस्त समितीमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे. हे आंदोलन विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, तसेच विमानतळात ज्यांच्या जमिनी संपादित झाली आहे कुटूंबियांना विमानतळामध्ये रोजगार मिळावा आणि पुनर्वसन पॅकेज देताना केलेल्या आश्वासनांची पूर्तता करा या तीन मुख्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त तरुण एकवटले होते. या आंदोलनाला 10 गाव समितीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बांधीत भूमिपुत्रांनी डोंगरावर चढून लोकनेते दि.बा पाटील लावण्यात यावे यासाठी डोंगरावरून एक हाक देण्यात आली.
तसेच विविध पक्षाकडून दहा गाव समितीला पाठिंबा दर्शवला यावेळी शेकडो भूमिपुत्रांनी डोंगरावर चढून हाक दिली लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे यावेळी प्रकल्प ग्रस्त भूमीपुत्र विजय शांताई नामदेव शिरढोणकर,कृ. उ. बा. समिती चे अध्यक्ष राजेंद्र पाटील,सचिन केणी, ऍड. विक्रांत घरत. विजय शिरढोणकर, राहुल मोकळ, प्रदीप म्हात्रे, मोहन घरत, मछिंद्र घरत, किरण केणी महेंद्र मुंगाजी, कवी तारेकर, विवेक मोकळ, सुहास पाटील, रुपेश मोहिते, सुधाकर कोळी,आगरी कविताचे बादशा पुंडलिक म्हात्रे, ऍड. प्रशांत भोईर, सुनील म्हात्रे, रोशन पाटील कोपर, बाळा नाईक सरपंच, महेंद्र नाईक, प्रकाश नाईक, संदीप नाईक, प्रकाश डाऊर, विनायक पाटील, तानाजी तारेकर, मिलिंद तारेकर, सुशील तारेकर, गुरुनाथ तारेकर, प्रवीण मोकळ, अमित म्हात्रे, अजय तारेकर, वैभव म्हात्रे, विजय पाटील, राम पाटील, प्रल्हाद केणी, अनिल पाटील, कुमार पाटील, वैभव पाटील, संदीप केणी,संजय अं. पाटील,संजय गं. पाटील, मिलिंद घरत, दिलीप मुंडकर, अनिल पाटील सरपंच, वाघीवली सर्व ग्रामस्थ, समीर मुंडकर, सुहास पाटील, दिलखुष केणी, अतिश पाटील, संतोष गावंड, जगदीश केणी, रोहिदास गोंधळी, जितेंद्र मुंडकर. नंदकुमार मुंडकर, निखिल भोपी, नितेश पाटील, संजय पाटील- तला, राहुल केणी, प्रवीण केणी, भूपेंद्र केणी, सुरज केणी, धीरज केणी, विजय केणी, धीरज परदेशीं, बळीराम पाटील, राम पवार, राजाराम पाटील, आदींसह परिसरातील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते.