-->
आपला महाराष्ट्र 24

भेंडखळ गावात संपन्न होणार श्री जरीमरी आई मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसरोहण सोहळा

           उरण: सुनिल ठाकूर :                       156 वर्षाच्या वर्षाची हरिनाम सप्ताहाची परंपरा असलेले उरण तालुक्यातील भेंडखळ हे गाव सांस्कृतिक,शैक्षणिक, कला,क्रीडा, अध्यात्मिक,धार्मिक सर्वच बाबतीत  नावाजलेले गाव आहे. गावातील ग्रामस्थ आपल्या हिंदू धर्मातील सर्व  देवी देवतांची मनोभावे पूजा करून महाराष्ट्रातील प्रत्येक सण,उत्सव आनंदाने साजरा करीत असतात.  भेंडखळ गावची जागृत देवता म्हणजे श्री जरी मरी आई होय. प्रत्येक संकटात धावून येणाऱ्या जरीमरी आईच्या मंदिराचा  जिर्णोद्धार करण्याचं ग्रामस्थांनी ठरवलं  आणि पाहता पाहता अवघ्या वर्षभरात हे मंदिर पूर्ण सुद्धा झालं.श्री जरी मरी आई मंदिर जीर्णोद्धार समिती, दानशूर मंडळी आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने  मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम अल्पावधीतच पूर्ण झाले आहे.भेंडखळ गावात श्री जरी मरी आईचे भव्य, सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे.
              य तीन दिवसांमध्ये श्री जरी मरी आई मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसरोहण सोहळा संपन्न झाला आहे.या सोहळ्यात जरी मरी आई मूर्तीची मिरवणूक, ग्रामप्रदक्षिणा, हरिपाठ, भजन, कीर्तन,प्रधान संकल्प,गणपती पूजन,मातृका पूजन, नांदी श्राद्ध, शांती होम, मूर्ती न्यास, प्रधानदेवता आवाहन, अग्निस्थापना, स्थापित देवता पूजन, स्थापित देवता हवन, मूर्तीनिद्रावास, कुंभ अभिषेक, मूर्ती प्राणप्रतिष्ठा,कलशारोहन, क्षेत्रफळ पूजन, पूर्णाहुती,महाआरती,महाप्रसाद व स्वागत समारंभ, बैंजो वादन,संगीतमय कार्यक्रम, गरबा नृत्य अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन या तीन दिवसांमध्ये करण्यात  आले होते . या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.