उरण :सुनिल ठाकूर - हाउस ऑफ टायटनच्या आयआरटीएच (IRTH) या प्रीमियम हँडबॅग ब्रँडला, त्यांचे पहिले खास ब्रँड स्टोअर मुंबईत सुरू करण्याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. विचारपूर्वक आणि नजाकतीने तयार केलेल्या हँडबॅग घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील पॅलेडियम मॉलसारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेले हे ब्रँड स्टोअर सज्ज झाले आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये ब्रँड लाँच झाल्यापासून, आयआरटीएच (IRTH) ने 130 मोठ्या फॉरमॅट स्टोअर्स आणि ऑनलाइन स्टोअरफ्रंट्सद्वारे 50 हून अधिक शहरांमध्ये आपला विस्तार केला आहे. ब्रँड अत्यंत वेगाने विस्तारतो आहे आणि आजघडीला ढोबळ मानाने सुमारे 90,000 ग्राहकांकडे IRTH बॅग आहेत. महिलांच्या एकूण हँडबॅग श्रेणीसह, 2023 आणि 2028 दरम्यान 10% च्या CAGR ने बाजारपेठ INR 7500 Cr पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उत्पादने ऑफर करून आनंद देण्याचे वचन आयआरटीएच देते. म्हणूनच आयआरटीएच च्या पोर्टफोलिओमध्ये महिलांच्या हँडबॅग्जपासून वर्कबॅग, उंच टोटे ते शोल्डर बॅग, हँडहेल्ड्स, स्लिंग्ज, क्रॉस-बॉडी बॅग, क्लचेस आणि वॉलेट्सची विस्तृत श्रेणी आहे.
पहिल्या स्टोअरच्या उद्घाटनासह, आयआरटीएच महिलांसाठी आनंददायी अनुभव घेऊन येत आहे. ब्रँडच्या खास आउटलेट्स आणि ऑनलाइन स्टोअरसाठी उत्पादनांची एक अनोखी श्रेणी तयार केली गेली आहे, ज्यात अस्सल लेदर एडिटचा समावेश असून, मिनी लेदर डिलाइट्स सुद्धा उपलब्ध आहेत.
श्री.मनीष गुप्ता, सीईओ - फ्रेग्रन्स आणि ॲक्सेसरिज विभागाचे, टायटन कंपनी लि. यांनी या लॉन्चबद्दल आनंद व्यक्त केला,“भारतातील फॅशन आणि शॉपिंग डेस्टिनेशन – मुंबईमध्ये आमचे पहिले स्टोअर सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रमुख स्थानांवर आपली उपस्थिती प्रस्थापित करत विस्तार करण्याचे आमचे ध्येय आहे. ग्राहकांना खरेदीचा अधिक विस्तृत अनुभव देणे आणि विस्तारित ग्राहक आधार लक्ष्य करणे, जे भौतिक स्टोअर्स आणि ऑनलाइन सुविधा या दोघांनाही महत्त्व देतो.”
संघटित हँडबॅग मार्केटमध्ये आपली स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीने भारतभरात FY27 पर्यंत सुमारे 100 स्टोअर उघडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ही जलद विस्तार योजना भरीव वाढीसाठी तयार असलेल्या बाजारपेठेत एक प्रबळ शक्ती म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी IRTH ची वचनबद्धता अधोरेखित करते.
“बाजारातील अनुकूल परिस्थिती आणि आमच्या उत्पादनांना मिळणारा उत्साही प्रतिसाद पाहता, आयआरटीएच आणि Fastrack या दोन्ही बॅग्स मधून एकत्रितरीत्या FY27 पर्यंत 1,000 कोटींहून जास्त महसूल ओलांडण्याची अपेक्षा करत आहोत,” असं श्री. गुप्ता पुढे म्हणाले. या रोमांचक नवीन अध्यायावर काम करत असताना, हा ब्रँड प्रीमियम महिलांच्या हँडबॅग्सचा अनुभव पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे आणि मुंबईतील महिलांना आयआरटीएच चे आनंददायी जग पाहण्यासाठी आमंत्रित करत आहे.