-->
आपला महाराष्ट्र 24

नेचर फ्रेण्ड सोसायटी (NFS) पनवेल ह्या संस्थेचा आठवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.


उरण (सुनिल ठाकूर ).
नेचर फ्रेण्ड सोसायटी (NFS) पनवेल ह्या निसर्गाचे संवंर्धन करणाऱ्या संस्थेचा आठवा वर्धापन दिन काळुंद्रे येथील श्री गणेश मंदिराच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजसेवक भरत देशमुख, माजी वन्यजीव संरक्षक उल्हास ठाकूर, सी.ए.  राजाराम गोळे, पशुवैद्य   ओमकार सरदार, वनसंरक्षक  सकपाळ साहेब, वनसंरक्षक 
 काळे साहेब तसेच समाजसेवक  संजयजी म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
ह्या कार्यक्रमात नेचर फ्रेण्ड सोसायटी (NFS) पनवेल चे संकेत स्थळ म्हणजेच वेबसाईट चे उद्घाटन मान्यवरांच्या हास्ते करण्यात आले, ह्या वेबसाइटची संपूर्ण माहिती आर्यन उदरे यांनी दिली. तसेच वन्यजीवांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
नेचर फ्रेण्ड सोसायटी (NFS) पनवेल अंतर्गत २०२३/२४ चा स्व.संतोष नामदेव फडके यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा सर्वोत्तम स्वयंसेवक पुरस्कार हा हुदरहेमान तारीक खान याला देण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष उदरे यांनी वनविभागाचे वन्यजीव आरोग्य केंद्रे तयार होईपर्यंत जखमी आणि अशक्त वन्यजीवांचे प्राण वाचण्यासाठी तातपुर्ते वन्यजीव प्राथमिक आरोग्य केंद्र वनविभागाच्या संपूर्ण मार्गदर्शन तत्वावर सुरू केल्याचे सांगितले. त्याच बरोबर आधुनिक युगात वावरताना वेबसाईट मार्फत आपली चळवळ जगासमोर पोहोचविणे गरजेचे असल्याचे सांगितले. 
   जेष्ठ सर्पमित्र  कुमार ठाकूर, ग्रीन वर्डस् ट्रस्ट चे विश्वस्थ डाॕ.निखील भोपळे, संस्थेचे सभासद मिथुन नाईक, संस्थेचे सहसचिव  सुशांत वेदक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर वनसंरक्षक श्
सकपाळ,सी.ए. राजाराम गोळे, माजी वन्यजीव संरक्षक  उल्हास ठाकूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजसेवक भरत देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
नेचर फ्रेण्ड सोसायटी (NFS) पनवेल ह्या संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार प्रदर्शन संस्थेचे सभासद शार्दुल वारंगे यांनी केले.
कार्यक्रमाचे सर्व आयोजन संचया म्हसकर, सिद्धी म्हसकर, संजना म्हसकर,  विघ्नेश पाटील, हर्ष देशमुख, राज भोपी, प्रतिक शेंदरे,  आर्यन उदरे, ममिता उदरे, लोकेश फडके, अक्षदा बैलमारे व सुशांत वेदक यांनी केले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.