-->
आपला महाराष्ट्र 24

उरणचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल : राजेंद्र पाटील

उरण (सुनिल ठाकूर ).
:येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उरणचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल तसेच तो शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उबाठा) गटाचा किंवा नॅशनॅलिस्ट काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचा असेल असे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी एक सभापती आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
२ ऑगस्ट रोजी उलवे येथे शेतकरी कामगार पक्षाचा ७७ वा ति वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा  करण्यात आला. यावेळी या ठिकाणी  शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडकविण्यात आला. झेंड्याला सलामी देताना मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनासाठी उलवे आणि परिसरातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमात राजेंद्र पाटील यांनी पुढे सांगितले, उरणचा आमदार हा आगरी, कराडी, कोळी,
 मराठी समाजाचाच असेल पण मारवाडी समाजाचा होणार नाही तसेच उद्योग व्यवसायाचे संबंध राखून जर कोणी येथे उमेदवारी घेत असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल १ ऑगस्ट रोजी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडी कडून जामीन मंजूर झाला आहे. आता त्यांना पनवेल च्या जिल्हा न्यायालया कडून जामीन मिळवायचा आहे.
  उरण च्या उमेदवारी उमेदवारीबाबत माजी आमदार  विवेकानंद पाटील हेच निर्णय घेतील  आणि ते जो निर्णय घेतील त्या उमेदवाराचा आम्ही उत्साहात प्रचार  करून या ठिकाणी महेश बालदी यांना  कसे पराभूत करता येईल याकडे  प्रामुख्याने लक्ष देऊ असे यावेळी  सांगण्यात आले.
यावेळी वहाळ ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.पूजा पाटील ,नाव्हा कमिटीचे अध्यक्ष आशिष पाटील, माजी सरपंच प्रशांत पाटील,   सुजित मोकळ,  रुपेश मोहिते, पनवेल कृ. उ. बाजार समितीचे संचालक सोमनाथ म्हात्रे, उलवे अध्यक्ष मनीषा पवार, उपाध्यक्ष कुलदीप तिवारी, मोरावे अध्यक्ष सतीश पाटील, हेमंत पाटील, संतोष पाटील,  दीपक तांडेल, उलवे नोडचे जेष्ठ नागरिक, शेकापक्षाचे नेते  पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.