-->
आपला महाराष्ट्र 24

बदलापूर येथे झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विभाग प्रमुख महेश सावंत आणि शाखा प्रमुख संजय भगत यांनी शाळांना भेटी देऊन दिले निवेदन

                                                  उरण :                                               (सुनिल   ठाकूर )  :                 बदलापूर येथे झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विभाग क्रमांक १० चे विभागप्रमुख श्री. महेश सावंत व शाखा क्रमांक १९३ चे शाखाप्रमुख श्री.संजय भगत यांनी  शाळेत साफसफाईला असणारे  कर्मचारी, सुरक्षा रक्षक, शिपाई यांची नावे , फोटो तसेच ठेकेदारांचे नाव व फोन नंबर  फलकावर असावेत (नवीन कर्मचारी आल्यास विद्यार्थी व पालकांच्या निदर्शनासही येऊ शकेल) या संदर्भात आज विभागातील प्रभादेवी महानगरपालिका शाळा क्रमांक २, तसेच आदर्श इंग्लिश हायस्कूल या शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापकांना निवेदन दिले  व विनंती पत्र देऊन शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा शब्द दिला. शाळेतील प्रशासनाने दोन दिवसात वरील कामगारांची संपूर्ण माहिती फलकावर लावली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी विधानसभा उपसंघटक सूर्यकांत बिर्जे ,उपविभाग संघटिका रेखा देवकर, शाखा संघटिका कीर्ती मस्के, छत्रपती पुरस्कार विजेते तारक राऊल, ज्येष्ठ शिवसैनिक रवी गजने, अनिल नागवेकर युवा सेनेचे साहिल कदम, तन्मय विलनकर तसेच अक्षय सुर्वे उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.