उरण (सुनिल ठाकूर ).
उरण सामजिक संस्था व महसूल विभाग पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 04/08/2024 रोजी साई तालुका पनवेल येथील कातकरी वाडी वरील सर्व आदिवासी लोकांचे जातीचे दाखले वाटप मा .जिल्हाधिकारी रायगड ,अप्पर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पनवेल विजय पाटील ,व ॲड सिध्दार्थ इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरहू कार्यक्रमा दरम्यान बोलताना आदिवासी समाजातील सर्व घटकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवण्याचे आश्वासन तहसीलदार पनवेल विजय पाटील यांनी दिले. अँड सिद्धार्थ इंगळे यांनी रायगड जिल्ह्यात पेसा कायदा लागू करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रा राजेंद्र मढवी, उपाध्यक्ष उरण सामजिक संस्था यांनी घरकुल योजना व रेशन कार्ड बनविण्यासाठी लवकरच कॅम्प चे आयोजन करण्यात येणार असल्याचे समितले. आदिवासी सेवक रत्नाकर घरत यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. मंडल अधिकारी कर्नाळामनोज मोरे, मंडळ अधिकारी संतोष पाटील, तलाठी लतिका जाधव, चिरनेर आश्रम शाळेतील मुख्याध्यापक मोरे सर, साई आश्रम शाळेतील शिक्षक व आदिवासी निरीक्षक पांढरे सर, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, सुनील जोशी, मनीष कातकरी, रायगड भूषण दत्ता गोंधळी यांनी सर्व आदिवासी बांधवांना एकजुटीने राहण्याचे आवाहन केले. सदरहू कार्यक्रमास ॲड अक्षय गवळी, सामाजिक कार्यकर्ते नितीन पगारे देखील उपस्थित होते. सदरहू कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक आदिवासी कार्यकर्ते अनंता वाघमारे व कृष्णा पवार, ग्राम पंचायत सदस्य यांनी केले.