उरण ( सुनिल ठाकूर ). शिवसेना उत्तर रायगड चे माजी जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र थोरवे, यांचे अत्यंत विश्वासो सहकारी संतोष भोईर हे सध्या जिल्हा प्रमुख आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा आमदार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्जत खालापूरचा विकास त्यामुळे वेगाने होणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघात आमदार थोरवे जातीने लक्ष देत आहे. त्यामुळे उरणच्या विकासासाठी व येथील शिवसैनिकांना योग्य स्थान आणि मान मिळवण्यासाठी संतोष भोईर च जिल्हाप्रमुख असावेत असे सर्व विभाग प्रमुख व शाखाप्रमुख यांचे सर्वांचे च एक मत आहे,असे, गव्हाण विभागीय प्रमुख प्रभाकर पाटील, उलवे शहर प्रमुख ऍड.भरत देशमुख, चिरनेर विभाग प्रमुख विजय पाटील, जासई विभाग प्रमुख वैभव पाटील, पनवेल तालुकाप्रमुख बाळा नाईक, सह सर्व शाखाप्रमुख वअनेक मान्यवरांनी प्रसार माध्यमांकडे स्पष्ट केले आहे. तर पक्ष शिस्त मोडणांऱ्या विरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याचा आग्रह या सर्व पदाधिकाऱ्यांनी धरला आहे.
शिवसेना उत्तर रायगड जिल्हा प्रमुखपदी संतोष भोईर च पाहिजेत.-- सर्व उरण मतदार संघातील सर्व पदाधिकारी यांची एकमुखी मागणी
byमुख्य संपादक - सुनील ठाकूर
•