-->
आपला महाराष्ट्र 24

कोलकाता येथे एका स्त्री डॉक्टरवर झालेल्या अत्याचारा विरुद्ध उलवे डॉक्टरांकडून कॅन्डल मार्च चे आयोजन.


उरण (सुनिल ठाकूर ).
कोलकाता येथे एका स्त्री डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी व तिला न्याय मिळावा म्हणून उलवे येथील इंडियन मेडिकल असोसिएशन,उलवे डॉक्टर असोसिएशन उलवे जनरल प्रॅक्टिशनर आणि डेंटल चिकित्सक डॉक्टरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोलकत्ता येथील डॉक्टर भगिनी वर झालेल्या अत्याचाराविरुद्ध जाहीर निषेध केला व तिच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून शेकडो मेणबत्या  पेटवून कॅन्डल मार्च काढून दोन मिनिटाचे मौन पाळले.
   या प्रसंगी उलवे येथील अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते, या मध्ये डॉ. श्रुतिका गव्हाळे, डॉ. संजीवनी मोरे डॉ. विकास मोरे, डॉ. अश्विनी देशमुख, डॉ. कृष्णा बोरकर, डॉ. बरुण कुमार, डॉ. पाटील, डॉ. हिवरे व डॉ.तबाजी जाधव. या सर्वांनी आपला आवाज सरकारपर्यंत जावा म्हणून व डॉक्टरांवर होणारे अत्याचार थांबावावे म्हणून आक्रोश करून घोषणाही दिल्या.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.