-->
आपला महाराष्ट्र 24

बी. एस. पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये भरली विठू नामाची शाळा.


उरण (सुनिल ठाकूर ).
के. बी. पाटील एज्युकेशन आणि वेलफेअर सोसायटीच्या बी. एस. पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल विंधणे येथे दि 17/7/2024 रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले.या वेळीं विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात व विठ्ठल रखुमाईचा वेश परिधान करून शालेय परिसरात दिंडी काढण्यात आली.
      आपली भारतीय संस्कृती व महाराष्ट्रातील संतांची समाज प्रबोधनाची कामगिरी या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वेळी शाळेचे वातावरण विठठलमय झाले होते, जणू काही विठ्ठलनामाची शाळाच भरली होती.
       या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी कैलास पाटील शाळेच्या सह शिक्षिका सौ सुजिता धनेश कोळी यांनी विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व सांगितले.
    या कार्यक्रमाच्या अनुसंघाने सह शालेय उपक्रम म्हणून तुळशीच्या चित्राला बोटांच्या ठश्याने पने काढणे हा उपक्रम घेण्यात आला.
   विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी असे कार्यक्रम व उपक्रम राबविले गेले पाहिजेत असे मत संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास पाटील यांनी व्यक्त केले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.