-->
आपला महाराष्ट्र 24

प्रा. राजकुमार कांबळे यांना (वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य, महाविद्यालय,फुंडे) मुंबई विद्यापीठाची Ph.D. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान.



उरण (सुनिल ठाकूर ).
 मुंबई विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे विभागाच्या वतीने(भूगोल,विषयातील) झालेल्या मौखिक परिक्षेत प्रा. राजकुमार कांबळे,(फुंडे महाविद्यालय)यांना मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत मानाची पीएच. डी. पदवी घोषित केली आहे. प्रा. राजकुमार कांबळे यांनी मार्गदर्शक,  डॉ. राजाराम पाटील,यांच्या  मार्गदर्शनाखाली " Trend of Urbanization in Ratnagiri District Prospects and Challenges 1981-2011" या विषयावर संशोधन करून आपला शोध प्रबंध मुंबई विद्यापीठात सादर केला होता. 
 मुंबई विद्यापीठाने आज दिनांक-१६ मार्च रोजी आयोजित केलेल्या मौखिक परीक्षेत प्रा. राजकुमार कांबळे यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी घोषित करण्यात आली.त्यांच्या यशात महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य,डॉ.प्रल्हाद पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभले.तसेच महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन, सदस्य यांचेही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.डॉ.विलास महाले,उपप्राचार्य यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले.प्रा.दिलीप केंगार,प्रमुख,भूगोल विभाग यांच्या सहकार्याने व मदतीने आपण ही पदवी प्राप्त करू शकलो असे प्रतिपादन डॉ.राजकुमार कांबळे यांनी व्यक्त केले.त्यांच्या संशोधनात त्यांच्या सुविध्य पत्नी,प्रा.अनुपमा कांबळे यांचेही मोलाचे सहकार्य व साथ लाभली.महाविद्यालयातील सर्व विषयाचे विभागप्रमुख तसेच सहकारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे डॉ.राजकुमार कांबळे आपल्या मनोगतात उल्लेख करतात.महाविद्यालयाच्या वतीने डॉ.राजकुमार कांबळे यांचे अभिनंदन करण्यात आले.वीर वाजेकर महाविद्यालयाच्या यशात एक मानाचा तुरा खोवण्यात प्रा.राजकुमार कांबळे यशस्वी झाले आहेत.त्यांच्या यशात महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व सेवक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.