उरण ( सुनिल ठाकूर ) भारतीय स्पोर्ट्स प्राधिकरण भारत युवा खेळ मंत्रालय भारत सरकार व तायकवांडो फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित मुलींची खेलो इंडिया राष्ट्रीय लीग जे येन इनडोअर स्डेडियम कटक ओडिसा येथे ९ ते ११ मार्च २०२४ रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी रायगडचे सुपुत्र तायकवोंडोचे आंतरराष्ट्रीय पंच व ७ वी डिग्री ब्लॅक बेल्ट यांची यांची तायकवोंडो खेळात निस्वार्थीखेलो इंडिया तायकवोंडो राष्ट्रीय स्पर्धे साठी स्पर्धा प्रमुख म्हणुन निवड झाली आहे तसेच या स्पर्धेसाठी खेळाडु म्हणुन निर्मिती दत्ता ( महात्मा फुले कॉलेज पनवेल )हिची निवड झाली आहे तसेच रायगडचे सुपुत्र सुभाष पाटील तायक्वांदो आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक व ७ वी डिग्री ब्लॅक बेल्ट यांची तायक्वांदो खेळात निस्वार्थीपणे पंच प्रशिक्षक म्हणुन देशात व परदेशात आतापर्यंत करत आलेल्या उल्लेखनीय कामगीरी ची दखल घेत व त्यांच्या अनुभवाचा फायदा खेळाडू, प्रशिक्षक व पंच यांना व्हावा व भविष्यात देशातुन उत्कृष्ट पंच प्रशिक्षक व खेळाडू तयार होतील म्हणून देशातील या खेळाची अधीकृत शिखर संघटना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या पदाधिकाऱ्यांनी सुभाष पाटील यांची कटक ओडिसा येथे होणा-या खेलो इंडिया राष्ट्रीय तायकवोंडो लीग स्पर्धा प्रमुख पदी नेमणुक केली आहे. तसेच खेळाडु म्हणुन निर्मिती दत्ता हिची निवड झाली आहे निर्मिती दत्ता गेली ६-७ वर्ष टाकवोंडोचे प्रक्षिक्षण सुभाष पाटील यांच्या कडे घेत आहे
सुभाष पाटील व निर्मिती दत्ता यांना वरील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल रायगड तायक्वांदो असोसिएसन, तायक्जांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) से पदाधिकारी / प्रशिक्षक व आमदार प्रशांत ठाकुर साहेब व महात्मा फुले कॉलेज चे प्राचार्य डॉ. गणेश ठाकुर सर यांनी विशेष अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.