-->
आपला महाराष्ट्र 24

साई मंदिर वहाळ येथे आरटीओ ऑफीसर किरण पाटील यांच्या वतीने अन्नदान व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त व्याख्यान.

उरण (सुनिल ठाकूर ).
साई मंदिर वहाळ येथे पेण येथील आरटीओ ऑफीसर किरण पाटील यांच्या वतीने अन्नदान व रस्ता सुरक्षा निमित्त व्याख्यान ठेवण्यात आले होते. 
      वहाळ येथील साई मंदिर हे नेहमीच भक्तगणांनी भरलेले असते. या मंदिरात विविध संस्था कडून अन्नदान होत असते साईंची आरती, महाप्रसाद यांचा लाभ अनेक भक्तगण घेत असतात. सायंकाळी सहा वाजता येथे दररोज आरती  होत असते व गुरुवारी सायंकाळी सात वाजता अन्नदान होत असते. 
       गुरुवार दिनांक १४ मार्च रोजी आरटीओ ऑफीसर किरण पाटील यांनी सायंकाळची  सहा वाजता साईंची आरती झाल्यावर सात वाजता अन्नदान करण्यात आले. त्याचबरोबर आरटीओ ऑफीसर किरण पाटील सर यांचे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने व्याख्यान ही झाले. 
     यावेळी या कार्यक्रमासाठी देवस्थान चे अध्यक्ष रवीशेठ  पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. पार्वती ताई पाटील, राष्ट्रवादी चे नेते भीमसेन माळी,विश्वस्त जगन शेठ पाटील, अनंत पाटील, मो. का. मढवी, विश्वास पाटील, एकनाथ ठाकूर, आदींसह साई भक्त उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.