उरण (सुनिल ठाकूर ).
ग्लोबल गोड टेलेंन्ट बुक ऑफ रेकॉर्ड
नवीमुंबई यांच्या विद्यमाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवराना राष्ट्रस्तरिय इंडियन एक्सेलेन्स अवॉर्ड व इंडियन एज्युकेशनल एक्सेलेन्स अवॉर्ड २०२४ पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून ४५० पुरस्कारासाठी अर्ज प्राप्त झाल होते, त्यातून ३० पुरस्कारार्थीची निवड करण्यात आलीआहे. पुरस्कार स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,गोल्ड मेडल रविवर दि.१० मार्च रोजी आगरी समाज मंगल कार्यालय, कामोठे. नवी मुंबई येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे संस्थेच्या संचालिका मेघा महाजन यांनी या वेळी बोलतांना सांगितले.
पुरस्कार प्राप्त मान्यवराची नावे पुढील प्रमाणे.इंडियन एज्युकेशनल एक्सलेन्स अवॉर्ड : शंकर भगवनसा शहाळे,उल्हास बाबाराव देशमुख,प्राची परचुरे वैद्य,राजश्री महेश म्हात्रे,हर्षा अजय मोडक,शीला जयकुमार चर्जन,राजेश प्रल्हादराव घायल, सुभाष यादव सरोदे.दिनेश सुभद्रा जिभाऊ निकम, संदीप धाकू परब.सोनवणे संभूराव ओंकार,सविता मधुसूदन भोईर,यशवंत मारुती घोडे,अजय जिरापुरे,शुभांगीनी रामदास वालदे,सुरेखा गजानन मोगरे,अंजली रविंद्र जाधव,शारदा अरुण गणोरकर,सुनील जाधव,मनोज रामदास किणी व इंडियन एक्सेलेन्स अवॉर्ड :अनंत देविदास बोरसे,सूर्यकांत महादेव गोवळे,डाॅ.दत्ताराम उध्दव राठोड,चंद्रकांत जाधव,रमेश तुकाराम झगडे, साधना वाल्मिक पाटील, शंकर सोनावणे,जयद्रथ आत्माराम आखाडे,पत्रकार सुनिल ठाकूर,जितेंद्र ढोले, डॉ.संतोष देवजी सावंत यांची संस्थेतर्फे निवड करण्यात आली आहे.