-->
आपला महाराष्ट्र 24

ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियम लीग ट्रॉफी अनावरण व खेळाडू निवड प्रक्रिया सोहळा संपन्न.


उरण (सुनिल ठाकूर ). विंधणे ग्रुपग्रामपंचायत प्रीमियर लीग चे शानदार आयोजन उपसरपंच मंगेश घरत व शक्ती म्हात्रे यांनी 7 मार्च ते 10 मार्च रोजी करण्यात आले. या सामन्याचा खेळाडू निवड प्रक्रिया व ट्रॉफी अनावरण सोहळा नुकताच छाया रिसॉर्ट येथे पार पडला.
  यावेळी ऍड. मानसी म्हात्रे, सरपंच निसर्गा रोशन डाकी, जेष्ठ नेते माजी सरपंच सुरेश डाकी शिवसेना शाखा प्रमुख प्रकाश तांडेल वैभव डाकी गोरख म्हसकर सत्यजित गावंड उधोगपती प्रसाद पाटील, रोशन डाकी,पनवेल पालिका स्थायी सभापती प्रविण पाटील,आरेखक शरद म्हात्रे, सदस्य वेश्वी अजित पाटील, सदस्य विंधणे सुरज म्हात्रे,आदी सह संघ मालक,खेळाडू उपस्थित होते.
यावेळी भाषण करताना उपगराध्यक्षा ऍडओवकेट मानसी म्हात्रे यांनी सरपंच निसर्गा डाकी यांनी केलेल्या कामांच तोंडभरून कौतुक केलं यावेळी बोलताना सरपंच निसर्गा डाकी यांनी केलेल्या कामांच्या जोरावर कधीच न मिळालेलं ग्रामपंचायत साठी स्मार्ट ग्राम पुरस्कार व 10 लाख रुपयांच बक्षीस ग्रामपंचायत विंधणे यांस मिळवून दिलेलं आहे तसेच विंधणे ग्रामपंचायत साठी ISO मानंकन मिळालं आहे शासनाकडून सिओ अलिबाग यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला आहे हे उपस्थित मान्यवरांना आवर्जून सांगितलं.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.