-->
आपला महाराष्ट्र 24

प्रेक्षकांच्या भेटीला आमचा कोळीवाडा (13 जानेवारीला पनवेलच्या नाट्यगृहात होणार सादर)

उरण (सुनिल ठाकूर ).
उरण भेंडखळ येथील आई एकविरा सांस्कृतिक कला मंच  प्रस्तुत आणि श्रीदत्त माऊली निर्मित आगरी कोळी भाषेतील धमाल नाटक आमचा कोळीवाडा 13 जानेवारी रोजी  पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी ४.३० वाजता नाट्य रसिकांच्या भेटीला येत आहे. नाटकाचे दिग्दर्शन शैलेश शिंदे यांनी केले आहे .तर  संगीत आनंद कुबल यांचे लाभले आहे. नृत्यदिग्दर्शन राज आंगणे यांनी केले आहे. नाटकात शैलेश शिंदे, वासुदेव म्हात्रे, दीपक घाग, चेतन पाटील, प्रवीण भावल, आशिष गांवड, परीशा सरोदे, रुचिता म्हात्रे,  मयुरी चव्हाण, निकिता पाटील व कौशिक म्हात्रे आदी रंगनायक अभिनय सादर करणार आहेत. अशी माहिती नाटकाचे लेखक व  निर्माते कलासक्त कलायात्री दत्ता भोईर यांनी दिली. सध्या या प्रयोगाच्या तालमीचा सराव थांबविण्यात आला आहे. अशीही माहिती भोईर यांनी दिली.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.