-->
आपला महाराष्ट्र 24

सदानंदाचा येळकोट ! जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात

उरण (सुनिल ठाकूर ).
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर आज पासून प्रारंभ झाला आहे. जेजुरी गडावर करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते चंपाषष्ठी उत्सवा निमित्त श्री खंडोबा व म्हाळसा देवींच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भारतात. या यात्रेमध्ये चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक काळात भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेवून मनी आणि मल्ल या आसुरांशी युद्ध करून विजय मिळवला व खंडोबाचा अवतार घेतला. या विजयाचे प्रतीक म्हणून मार्गशीर्ष प्रतीपदे पासून सहा दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो.
आज सकाळी खंडोबा देवाला अभिषेक पूजा घालून गडावरील रंग महालात करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, अनिल सौंदडे अड पांडुरंग थोरवे, विश्वास पानसे उपस्थित होते. जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान जेजुरी, जेजुरी देव संस्थान, पुजारी सेवक वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस, त्रिकाळ आरती, महापूजा, महाआरती, वाघ्या मुरुळींचे जागरण गोंधळ, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे जेजुरी गडावर आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे नियोजन जयमल्हार चंपाषष्ठी प्रतिष्ठानचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, बाळासाहेब दीडभाई, बापू सातभाई, हरिभाऊ लांघी, सतीश कदम, अनिल आगलावे, महेश बर्भसी, चेतन सात भाई, अविनाश बारभाई आदींनी केले आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.