उरण (सुनिल ठाकूर ). कै. कमल्या हाल्या पाटील आणि गणा हाल्या पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून ओमकार सांस्कृतिक भजन मंडळ उरण पूर्व विभाग यांच्या सहकार्या तुन व नियोजनातून रमेश बाळाराम पाटील व दिलीप कमळ्या पाटील यांच्या परिवारा तर्फे वेश्वी येथे दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रायगड भूषण डी. आर. ठाकूर,, अशोक बुवा पाटील,विलास बुवा मढवी, मोहन बुवा पाटील, सुरेश बुवा पाटील, विकास बुवा कडू, मोतीराम बुवा मढवी, गोवर्धन बुवा पाटील, जगदीश बुवा पाटील, दिगंबर बुवा कडू, मनीष बुवा मढंवी, राजुबुवा
माळी, संदिप बुवा कडू, सोमनाथ नाईक, यश रसाळ आदीच्या सुश्राव्य भजनाने श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले.
यावेळी कोरोना काळात उत्कृष्ठ वैद्यकीय सेवा करणारे डॉ. अशोक शिंदे, डॉ. प्रकाश मेहता, डॉ. तेजस पाटील तसेच MLB. Cup INDIA 2023 पंजाब येथे खेळण्यात येणाऱ्या बेसबॉल स्पर्धेसाठी अथर्व रमेश पाटीलची इंडीयन मॉडल स्कूल उलवे मधून सिलेक्षण झाले. सदर टीमला बेस्ट स्पोर्ट्स मॅन शिप अवार्ड 2023 मिळाला. पाटील कुटुंबामधून पंजाब येथे खेळण्यासाठी जाणारा अथर्व रमेश पाटील हा पहिला मुलगा आहे याचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच विलास पाटील, सुनिल तांबोळी, अजित पाटील, गीतांजली अरविंद पाटील, शेकाप नेते मेघनाथ तांडेल, उधोजक तेजाब म्हस्के, शिवसेना शाखा प्रमुख रवींद्र पाटील, डी, एस. पाटील (अध्यक्ष ज्ञानदीप ग्रंथालय ), पदाजी कडू, शशिकांत मुंबईकर, प्रभाकर मुंबईकर कृष्णा मुंबईकर आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.
कार्यक्रमा चे शानदार निवेदन शाम ठाकूर यांनी केले. तर आभार रमेश पाटील यांनी मानले.