-->
आपला महाराष्ट्र 24

शेकाप दिघोडे गाव चिटणीस पदी हितेश गुणवंत ठाकूर यांची निवड


उरण (सुनिल ठाकूर ).
स्वर्गीय दामूशेठ ठाकूर यांचे नातू हितेश गुणवंत ठाकूर यांची नुकताच शेकाप दिघोडे गाव चिटणीस पदी निवड करण्यात आली.
        शेतकरी कामगार पक्ष उरण तालुका चिटणीस विकास चंद्रकांत नाईक यांनी हितेश गुणवंत ठाकूर यांना दिघोडे गाव  चिटणीस पदाचे नियुक्तीपत्र दिले तसेच पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या .
सदर  वेळेस नरेश शेठ घरत, रमाकांत म्हात्रे ,प्रफुल पाटील् अनंत कोळी जयेश कोळी  रमेश कोळी, विकास माळी,  प्रफुल्ल मात्रे ,शशिकांत ठाकूर ,शक्ती कोळी, पंकज कोळी,  नरहरी कोळी,  अभिषेक ठाकूर इत्यादी उपस्थित होते.
  दिघोडे गावांमध्ये पूर्वीपासून स्वर्गीय आत्माराम शेठ नाखवा आणि स्वर्गीय दामूशेठ ठाकूरअशी दोनच घर शेतकरी कामगार पक्षाची होती  हळू हळू पक्ष वाढत जाऊन एक छोट्या रोपट्याचं वटवृक्ष झालं कालांतराने जरी शेतकरी कामगार पक्षाची पडझड झाली असली तरी पण दिघोडेगावात शेतकरी कामगार पक्ष आघाडीवरच राहिला एक  काल होता की शेतकरी कामगार पक्षा चा एकही सदस्य ग्रामपंचायत मध्ये लागणं कठीण होत परंतु आजच्या घडीला तीन सदस्य गेल्या निवडणुकीच्या वेळेस विजयी करून  शेतकरी कामगार पक्षाने   आपली ताकद दाखवलेली आहे. आणी  तीच ताकद घेऊन शेतकरी कामगार पक्ष 2024 च्या ग्रामपंचायतच्या  निवडणुकीला तरुण पिढीच्या हातात सूत्रे देऊन  सज्ज झालेला आहे.मागच्या वेळेस तीन सदस्य निवडून आल्यानंतर ह्यावेळेस जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील ह्याकडेे प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाचे लक्ष असेल
        शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस पद भेटल्यानंतर हितेश ठाकूर ह्यांना विचारणा  केली असता त्यांनी सांगितले मी शेतकरी कामगार पक्ष वाढीस नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीनआणि चिटणीस पदा खाली गावातील जेवढी रखडलेली कामे आहेत ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीन.
हितेश ठाकूर यांची दिघोडे गाव चिटणीस पदी निवड झाल्या बद्दल त्यांनी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांची भेट घेतली. यावेळी बाळाराम पाटील यांनी हितेश ठाकूर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    हितेश गुणवंत ठाकूर यांची दिघोडे गाव चिटणीस निवड पदी झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.