-->
आपला महाराष्ट्र 24

खांदा काॅलनी, नवीन पनवेल येथे पारंपारिक मंगळागौरीचा सण उत्सहात साजरा.


उरण (सुनिल ठाकूर ).
 सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात माणसाला श्वास घेणं पण अवघड होते.त्यात नोकरी करणा-या स्त्रीया तर तारेवरची कसरतच करत असतात.अशा परिस्थितीत सुध्दा थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून पारंपरिक सणांची त्या आतुरतेने वाट पाहत असतात.ही त्यांची हुरहूर सौ.नेत्राली नारायण ठाकूर, खांदा काॅलनी, नवीन पनवेल यांनी बरोबर हेरली आणि त्यांनी त्यांच्या घरी मंगळागौरीचा घाट घातला.अशा मंगला गौरी साठी यात कमीतकमी बायकांच्या स्नेह संमेलनात  पारंपारिक मंगळागौरीची सण मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
खरंच हौसेला मोल नसते याचं हे  उदाहरण म्हणावं लागेल.
  या मंगला गौरी खेळा मध्ये डॉ .सौ.इंद्रायणी संतोष आगलावे,  सौ.सारीका निवृत्ती आगलावे, सौ.प्रतिमा धनंजय कांबळे, सौ.कल्पना विकास कडू, सौ.शोभा सुरेश साळुंखे, सौ. छाया दिलीप जगताप आणिआयोजक  सौ. नेत्राली नारायण ठाकूर.यांनी सहभाग घेतला होता.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.