-->
आपला महाराष्ट्र 24

अजिवली येथे आयुष्मान भव: मोहिमेचे उदघाटन

उरण (सुनिल ठाकूर ).
आज दिनांक १३/०९/२०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अजिवली येथे आयुष्मान भव: या मोहिमेचे उद्घाटन कोन ग्रामपंचायत चे माजी सरपंच   परशुराम माळी  यांचे शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी आयुष्यमान भव:* कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित परशुराम माळी  यांचे डाॅ.आदिती म्हात्रे ,वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र अजिवली यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात  आले.
   कार्यक्रमासाठी आलेल्या उपस्थितांना श्री.संदेश गोवारी (आरोग्य सहाय्यक) यांनी आयुष्यमान भव:* मोहिमे बाबत विस्तृत माहीती सांगून केंद्र व राज्य शासनच्या आरोग्या विषयी विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली. तसेच यावेळी  उपस्थितांनी अवयव दाना बाबत शपथ घेतली.
          सदर  कार्यक्रमास कोन ग्रामपंचायत चे माजी सरपंच परशुराममाळी,  डॉ. अदिती म्हात्रे (वेधकीय अधिकारी ),एस. जे. रविढोणे (आरोग्य सहाय्यिका ),एस. एन. वानखेडे (प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी ), एस. एच. गोवारी (आरोग्य सहाय्य्क  ),एस. ए. मढवी (औषध निर्माण अधिकारी),पी. बी.शिंदे (कनिष्ठ सहाय्य्क ),एस. एस. नागरगोजे (आरोग्य सहाय्यिका ),एस. एस.सोनावले (आरोग्य सेविका ), पी. एस. भोपी (डेटा औपरेटर ),पी. बी. भगत, डॉ. स्वेता पाटील आदी सह आरोग्य केंद्र अजिवली चे कर्मचाऱी वृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.