उरण (सुनिल ठाकूर ). बांधपाडा ग्रुप-ग्रामपंचायतीतील उप-सरपंच श्री,सुजित म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उप-सरपंच पद रिक्त झाले होते.या उप-सरपंच निवडीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर,तालुकाप्रमुख,संतोष ठाकूर तालुका संघटक बी.एन डाकी, यांच्या आदेशानुसार रितेश ठाकूर यांना उमेदवारी दिली गेली व त्याप्रमाणे उप-सरपंच पदासाठी त्यांचा शिवसेना,काँग्रेस आघाडी तर्फे अर्ज दाखल केला.तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री देवानंद पाटील यांनी सुद्धा उप-सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला ,परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेनेचे रितेश ठाकूर हे बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आले.त्याबद्दल खोपटे पंच-क्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना-उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर ,तालुका संघटक तसेच अवजड वाहतूक सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष बी. एन. डाकी,शिवधन पतपेढी चे संचालक गणेश म्हात्रे,माजी सरपंच सौ.भावना म्हात्रे ,माजी सरपंच सौ. प्रीती पाटील,माजी खासदार प्रतिनिधी अजित ठाकूर,मा. शाखाप्रमुख विश्वनाथ पाटील,मा.शाखाप्रमुख बाळकृष्ण ठाकूर,शाखाप्रमुख नंदकुमार ठाकूर,काँग्रेस जेष्ठ कार्यकर्ते केशव घरत, भालचंद्र म्हात्रे ,मा.उप-सरपंच सुजित म्हात्रे ,ग्राम पंचायत सदस्या सौ. जागृती घरत, सौ .करिष्मा म्हात्रे ,सौ.भावनापाटील, सौ.शुभांगी ठाकूर,सौ.राजश्री पाटील,सौ.मीनाक्षी म्हात्रे,अविनाश ठाकूर,प्रीतम पाटील,लक्ष्मण घरत, चिरले गावचे माजी उप-सरपंच समाधान माळी, अभिजित म्हात्रे,विश्वास ठाकूर, देवानंद पाटील(शिवधन पतपेढी ), तसेच गावातील मान्यवर ह्या उप-सरपंच पदाच्या निवडीसाठी उपस्थित होते.