रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय महालण विभाग फुंडे येथे
दिनांक 26 जुलै 2023 रोजी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल व करीयर गायडंस सेल व रायगचा युवक फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सैन्य व सुरक्षा नोकर भरतीचे कार्य शाळा चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते द्ववीप प्रज्वलनाने झाली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्लेसमेंट सेलचे चेअरमन डॉ. आमोद ठक्कर यांनी केले. कार्य शाळेचे उद्घाटन मा. सुनिल बोंडे असिस्टंट कमिशनर ओफ पोलीस नवी मुंबई ह्यानी केले. विद्यारथ्यांना मार्गदर्शन करताना भारत हा तरूणांचा देश आहे. आपण सर्व करतुत्वान आहात. माझ्या साठी अशक्य काही नाही असा आत्मविश्वास बाळगा. जसे राजमाता जिजाऊ ह्यांनी स्वराज्य साठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले, छत्रपती शिवाजी महाराजांनी ध्यैय पुर्तता करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतीकूल परिस्थिती वर मात करून प्रचंड अभ्यास करून संपूर्ण जगात आपल्या करतुत्वाची छाप पाडली, तसेच आपणही आपले ध्येय निश्चित करावे त्या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपले ऊद्दीष्ट गाठायचे. आपण शाहू महाराज , महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जायचे आहे. आपला देश तरूणांचा देश आहे त्याला महासत्ता बनण्यास कोणी रोखू शकत नाही. जसे स्वराज्या साठी मावळे लढले तसेच देश सम्रुद्ध होण्यासाठी आपणही महेनत करुन यशस्वी व्हावे असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे श्री जयपाल पाटील रायगड भुषण यांनी सैन्य भरती,पोलीस, बी. एस. एफ., सी आए एस एफ ईत्यादी नोकरीच्या संधी व त्या साठी आवश्यक गुणवत्ता, त्यासाठी लागणारे प्रशिक्षण ह्याची सखोल माहिती दिली. तसेच आपत्ती व्यवस्थापन व त्याची आवश्यकता ह्याचे सविस्तर विश्लेषण केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य डॉ पी. जी. पवार यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमात ध्यैय पुरती साठी आत्मीक सद्रुढतचे महत्त्व प्रजापती ब्रह्मा कुमारी च्या संचालीका तारादेवी यांनी सांगितले.
या प्रसंगी भारतीय संविधानाचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा ऊत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी नियोजन प्रा पंकज भोये प्रा.भूषण ठाकूर प्रा संतोष देसाई व प्रा कांबळे राजकुमार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षिता म्हात्रे यांनी केले.