-->
आपला महाराष्ट्र 24

२०३० पर्यंत १.५ अब्ज रूग्णांना मिळणार तत्काळ सेवा

मुंबई, दि.१० (प्रतिनिधी) : स्वस्त आणि नाविन्यपूर्ण औषधांच्या उपलब्धतेत मदत करण्यासाठी अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने (एडब्ल्यूएस) हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी सोबत करार केला आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून कंपनीने तिचे एसएपी प्लॅटफॉर्म पूर्णपणे एडब्ल्यूएसवर स्थलांतरित केले आहे. जगातील आघाडीच्या क्लाउडवर प्लॅटफॉर्मचे केंद्रीकरण करून डॉ. रेड्डीज नवीन आरोग्य सेवा अॅप्लिकेशन्सच्या विकासाला गती देईल, २०३०पर्यंत जगभरातील १.५ अब्जाहून अधिक रुग्णांना सेवा प्रदान करण्यासाठी तिचे डिजिटल व्यासपीठ आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना अधिक चांगल्याप्रकारे रुग्णांच्या प्रकृतीची स्थिती जाणून घेण्यास सक्षम करणार आल्याची माहिती डॉ. रेड्डीजचे मुख्य माहिती आणि डिजिटल अधिकारी मुकेश राठी यांनी दिली. 

राठी पुढे म्हणाले की, "एडब्ल्यूएसच्या सोबतीने अॅप्लिकेशन विकसित करण्यास लागणारा वेळ ३० टक्क्यांनी कमी करणे, अंतर्गत ऑपरेशन्स सुधारणे, जेनेरिक औषध निर्मिती प्रक्रियेतील सुधारणांना गती देणे आणि नावीन्यतेच्या नव्या क्षेत्रांना चालना देणे हे डॉ. रेड्डीजचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरला स्वयंचलित करण्यासाठी डॉ. रेड्डीज २०१९पासून डिजिटल ऍप्लिकेशन्स तयार करत आहे आणि त्यांना एडब्ल्यूएसवर स्थलांतरीत करीत आहे. एडब्ल्यूएसच्या सुविधांचा लाभ घेत डॉ. रेड्डीजने तिच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी नवीन अॅप्लिकेशन्स अधिक वेगाने उपलब्ध केले आहेत आणि तिची आरोग्यसेवा अधिक सुलभ बनवली आहे तसेच “एडब्ल्यूएसचे वैविध्यपूर्ण क्लाउड तंत्रज्ञान आणि जागतिक पायाभूत सुविधा तसेच जगभरातील आरोग्यसेवा ग्राहकांना मदत करण्याचे सिद्ध कौशल्य यांमुळे डॉ. रेड्डीज तिच्या आयटी ऑपरेशन्सचे पर्यावरणीय परिणाम कमी करून ग्राहक व रुग्णांना चांगले अनुभव प्रदान करण्यास सक्षम बनते”, अशी माहिती अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस इंडीया प्रा. लि.मधील एडब्ल्यूएस भारत आणि दक्षिण आशिया विभागाच्या संचालक वैशाली कस्तुरे यांनी दिली.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.