उरण (सुनिल ठाकूर ).
आज दिनांक ०६-०७-२०२३ रोजी, *मा.श्री संदेश भाई ठाकुर - (रायगड-जिल्हा अध्यक्ष मनसे) यांच्या मार्गदर्शनाखाली, व श्री. धनंजय भोरे (उरण शहर अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली*उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री. राहुल इंगळे साहेब यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तक्रार पत्रक देण्यात आले,सदर विषय *उरण शहरातील उरण - मोरा रोड रस्त्या मधील लाईट चे पोल व त्या रस्त्या लागत असलेले गटारे यांचे लवकरात लवकर काम करण्याबाबात, उरण शहरातील काही ठिकाणी (बोरी, कुंभारवाडा,मोरा रोड) राहिलेली (गटारे) नालेसफाई करण्याबाबत, उरण शरहातील विमला तलाव शुशोभीकरण व तळ्यातील गाळ काढण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्ना बाबत व गटारे यांच्या मधील असलेली पाण्याची लाईन स्थलांतरीत करण्याबाबत* पत्रक देण्यात आले, पत्र देताना उपस्तिथ *उरण शहर सचिव श्री.दिनेश हळदणकर, महिला उपतालुकाअध्यक्ष - सौ.कविता म्हात्रे, उरण शहर संघटक -श्री.गणेश तांडेल,उरण शहर उपाध्यक्ष -श्री.उमेश वैवडे,उरण शहर उपाध्यक्ष-श्री.हितेश साळुंखे, उरण शहर अध्यक्ष (म.न. वि.से) - श्री.प्रतिक अमृते, विभाग अध्यक्ष - श्री.दत्ता पाटील, श्री.सुरेश अय्यर (अण्णा), श्री.राजेश सरफरे, व ओम शेरे* आदी सर्व मनसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.