ध्यास समाजाच्या अस्तित्वाचा !हेच धेय्य उराशी बाळगत भूमिपुत्र समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आलेली आपल्या हक्काची संघटना म्हणजेच आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था याच संघटनेच्या वतीने संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष सुमित थळें.यांच्या आयोजनातून मुळेखंड करंजा रोड येथील आगरी ढाबा या हॉटेल मध्ये सन्मान समाज बांधवांचा या विशेष अशा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमअंतर्गत विशेष सत्कारमूर्ती म्हणून आपल्या समाजातील विविध उद्योग व्यवसाय क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे नवंउद्योजक *श्री.जिगनु चिंतामण कोळी,शिक्षण कोचिंग क्लासेस व्यवसाय क्षेत्र , पायल विलास पाटील. युट्यूब फेम कलाकार ,श्री. गिरीष प्रभाकर म्हात्रे,हॉटेल व्यावसायीक श्री.प्रशांत रघुनाथ म्हात्रे*. मटण,चिकन खाटीक व्यवसाय, श्री.अजित हरिश्चंद्र म्हात्रे.चिकन विक्री व्यावसायीक या पाच रत्नांना सन्मान समाज बांधवांचा हा मानाचा पुरस्कार शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आपल्या स्वकर्तुत्वाच्या बळावर सामान्य व्यक्ती ते यशवी उद्योजक,व्यावसायिक असा प्रवास करून आपल्यासमाजाच्या प्रगतीस हातभार लावून समजातील होतकरू युवा तरुण - तरुणींना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करून खऱ्या अर्थाने आपल्या समाजातील तरुण तरुणींना एक संदेश दिलाय की आत्ता आपण नोकऱ्यांच्या मागे न पळता नोकरी करून नोकरदार नाही बनायचं तर उद्योग व्यवसाय करून मालक बनायचं ! हाच पक्का निर्धार मनाशी बाळगून आपल्या अंगात असणाऱ्या कला कौशल्याचा योग्य तो उपयोग करत हिम्मतीने खंबीरपणे उभं राहून उद्योग व्यवसायात आपल्या नावाचा एक ब्रंड निर्माण करून आपलं नावं मोठं करावं! या कार्यक्रमाचं सूत्रंचालन संघटनेचे .कार्याध्यक्ष .. *.श्री.रोहन पाटील* यांनी केलं तर आभार प्रदर्शन संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष सुमित दादा थळे यांनी केले.
आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था उरण तालुका विभागाच्या वतीने आणि उरण तालुका अध्यक्ष सुमित थळे यांच्या आयोजनातून साकारलेल्या सन्मान समाज बांधवांचा ह्या कार्यक्रमा करिता प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली ती आगरी , कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष .श्री.रोहन पाटील उरण तालुका अध्यक्ष.सुमित थळे उरण तालुका सचिवश्री.अनिल घरत, नवघर विभाग अध्यक्ष श्री.भूपेंद्र पाटील,मुळेखंड गावातील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष *श्री.प्रकाशजी म्हात्रे*,कार्याध्यक्ष श्री. अनंतजी पाटील,मुळेखंड कोळीवाडा गावं अध्यक्ष श्री.हितेश म्हात्रे,उपाध्यक्ष जगदीश म्हात्रे, खजिनदार चेतन म्हात्रे, सदस्य स्नेहल कडू, अमोल पाटील, संतोष म्हात्रे,वैभवजी म्हात्रे, अतिश म्हात्रे, किशोर पाटील तसेच मुळेखंड कोळीवाडा,कुंभारवाडा गावं कमिटी, आगरी, कोळी कमिटी यांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.