-->
आपला महाराष्ट्र 24

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नढाळ येथील श्री क्षेत्र पंचायत मंदिर सभागृहामध्ये दुर्घटनाग्रस्त बांधवांचे सांत्वन, विचारपूस.

 उरण (सुनिल ठाकूर ) 
 जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायत मंदिर सभागृहामध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त बांधवांचे सांत्वन आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, ज्येष्ठगायिका अनुराधा पौडवाल भेटी दिल्या,त्यांनी व्यक्तिशः दुर्घटनाग्रस्त बांधवांशी चर्चा केली.त्यांच्या समस्या आणि त्यांच्या भविष्यातील आवश्यक त्या गरजा जाणून घेतल्या.यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे व त्यांची टीम उपस्थित होती.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.