-->
आपला महाराष्ट्र 24

उरण नगरपरिषदचे माॅसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालय येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजन



उरण (सुनिल ठाकूर ).
 सन्माननीय *मा. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागीय आयुक्त यांची संकल्पना आणि उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी मा. श्री. राहूल इंगळे* यांचे मार्गदर्शनाखाली.शनिवार, दि. १०/६/२०२३ रोजी ग्रंथपाल श्री संतोष पवार यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते.
शनिवार, दि. १०/६/२०२३ रोजी सकाळी ११:३० वा. एमपीएससी, तलाठी भरती, वन रक्षक भरती या स्पर्धा परीक्षे संदर्भात  *मा. श्री. राजेंद्र हनुमंत गायकवाड, सहाय्यक निबंधक गृहनिर्माण संस्था, उरण* यांचे *व्याख्यान*  आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाचे वैशिष्ट्य असे की , सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त कृतीयुक्त सहभाग घेतला . त्यामुळे व्याख्याते आणि विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले.
या शिबिरानिमित्त लाभलेले मुख्य व्याख्याते सन्माननीय *श्री. राजेंद्र हणमंत गायकवाड , सहाय्यक निबंधक , उरण* यांना ग्रंथपाल श्री. संतोष पवार आणि ग्रंथालय सहाय्यक श्री .जयेश वत्सराज ,राम चौहाण प्रोप्रा. एकवीरा ॲकॅडमी, उरण , गजानन जुवेकर आणि उपस्थित विद्यार्थी  यांच्या शुभहस्ते झुंज क्रांतीवीरांची हे पुस्तक आणि कुंडीसह रोपटे देवून सन्मानित करण्यात आले. याच वेळी उरण तालुक्यातील महिला पोलीस म्हणून ज्यांची निवड झाली त्या *मिनल जयेश घरत , आणि निकीता पिंगळे आणि उपस्थित विद्यार्थ्यांनमध्ये कु. युक्ती सुनील भोईर, कोटनाका, उरण (, ईयत्ता १० वी गुण ९३%)* यांनाही सन्मानित करण्यात आले. 
उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून स्पर्धा परीक्षांकडे निश्चित आपल्या भागातील विद्यार्थ्यांचा वाढतो आहे , हे समाधान ग्रंथपाल संतोष पवार यांनी व्यक्त करताना आज उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री राहूल इंगळे यांच्या सहकार्याने बहुतांश स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके माॅसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालय, उरण येथे आपलब्ध आहेत या बाबतही माहीती दिली..
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.