उरण (सुनिल ठाकूर ).
दिनांक- 21 जून २०२३ रोजी वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेज महालण विभाग फुंडे मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थी व प्राध्यापकां साठी योग व मेडीटेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली . सुरुवातीला मान्यवर पाहुणे श्री एच के पाटील टीचर आर्ट ऑफ लिव्हिंग, सौ आनंदा माळी,सौ प्रगती ठाकूर सौ योगसाधना पाटील ह्यांचे स्वागत मान प्राचार्य पी. जी. पवार ह्यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. डॉ. आमोद ठक्कर ह्यांनी केले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मान प्राचार्य पी. जी. पवार ह्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्या मागची पार्श्वभूमी व त्याची आजच्या धकाधकीच्या जीवनात आजची आधुनिक जीवनशैली, फास्ट फूड तसेच रसायनमिष्रीत आहार, समाज माध्यमांचा अतीवापर, व्यसनाधीनता ह्यामुळे असलेल्या गरजेचे सविस्तर विश्लेषण करून समृद्ध भारतासह सुदृढ भारत घडविण्यासाठी योग चे महत्त्व मांडले.
आर्ट ऑफ लिव्हिंग, उरण* चे हरिश्चंद्र पाटील, सौ. मिलिंदा माळी, सौ. प्रगती ठाकूर व सौ. योगसाधना पाटील ह्यांनी
मंडळी योग म्हणजे सहजता, तसेच दृष्यशरीर, सुक्ष्मशरीर व चेतना ह्यांचे श्र्वासाद्वारे नियमन.
आजचा दिवस साजरा करताना ह्या वर्षी *"वसुधैव कुटुंबकम"* ही थीम वापरली गेली.
*सुदर्शन क्रिया* हे एक श्वासाचे साधे, सोपे पण अनोखे व अतिशय परिणामकारक असे तंत्र आहे. त्याद्वारे जगभरात करोडो लोकं आपले आरोग्य अबाधित ठेवून जीवनात आनंदाची अनुभूती घेत आहेत. हे तंत्र आपल्या मज्जासंस्थेवर , काम करते, आपल्या फुफ्फुसाची क्षमता वाढविते आणि आपल्याला जगण्यासाठी अत्यावशयक असणारा जास्तीचा ऑक्सिजन मिळतो व आपण आनंदी जीवनशैलीचा अनुभव घेतो. विद्यार्थ्यांना योग चा उपयोग त्यांच्या अभ्यासासाठी व उत्तम आरोग्यासाठी व्हावा ह्या उद्देशाने कार्यशाळेत अनेक योगासने विद्यार्थ्याकडून करून घेतली.