उरण (सुनिल ठाकूर )
भिवंडी दि.१६ (प्रतिनिधी) अप्पर ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी परिसरातील लोढा टाउनशिप येथील युरो स्कूलच्या ५०० विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचा प्रवेशोत्सव १२ जून २०२३ रोजी होणार आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षणाचे विश्व खुले करून देण्यात आले आहे. शिकण्यासाठी पूरक वातावरणाबरोबरच इथे स्वतःच्या विविध गुणांचा शोध घेण्याची संधी मुलांना मिळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वर्ग, क्रीडा आणि परफॉर्मिंग आर्ट्ससाठी आधुनिक सुविधा, 300 आसनी सभागृह, सुसज्ज, लहान मुलांसाठी खास तयार करण्यात आलेली खेळाची जागा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब आणि इतर सुसज्ज प्रयोगशाळा यांचा समावेश आहे.
याविषयी युरोस्कूल अप्पर ठाणेच्या मुख्याध्यापक श्रीमती भावना नवानी म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आधुनिक शिक्षण देण्यावर युरोस्कूलचा कटाक्ष असतो. लोधाच्या सुंदर टाउनशीपमध्ये वसलेले हे कॅम्पस विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक बनण्यासाठी सक्षम करेल. इथल्या व जवळपासच्या मुलांचा विकास करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. नव्या संधींचा शोध घेण्यासाठी, सबलीकरणासाठी आणि समाजाचे रूपांतर करण्यासाठी शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. या नव्या प्रवासाची सुरुवात करताना आपण शिक्षण क्षेत्रातील जागतिक मापदंड आणि त्यांचा मुलांच्या आयुष्यावर होणारा परिणाम विचारात घेतला पाहिजे. आमची नवी शाळा विद्यार्थ्यांसाठी आशा व संधींचा नवा किरण आहे. फाउंडिंग बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना व नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करताना आम्हाला आनंद होत आहे.’