-->
आपला महाराष्ट्र 24

करावे येथील ज्ञानदीप विद्यालय माजी विध्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.


उरण (सुनिल ठाकूर ).
एसएससी बॅच सन १९९७-९८ च्या विद्यार्थ्यांनी बॅच चे रौप्य महोत्सवी वर्ष ज्ञानदीप विद्यालयात उत्साहात आणी खेळीमेळीच्या वातावरणात साजरा केला. या प्रसंगी शाळेतील ९७-९८ च्या बॅच चे ५६ विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.व यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सुरुवातीस विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. सरस्वती पूजनानंतर प्रार्थनेने माजी विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली. सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून देताना विद्यालयातील  जुन्या आठवणीना उजाळा दिला. 
या प्रसंगी २५ वर्षा पूर्वीच्या शिक्षकांचा शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. 
या प्रसंगी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. शोभना पाटील यांनी विद्यार्थ्यांना शाळेशी कायम स्नेह ठेवण्याचे आवाहन केले. श्री वाणी सरांनी सुंदर कविता म्हणून उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापक श्री पाटील सरांनी उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. श्री तांडेल सरांनी माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या विकासात कसा मोलाचं सहभाग आहे ते सांगितले. सौ जाधव बाई आणि श्री रमेश अहिरे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते 
सर्व माजी विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देवून सन्मानित केले गेले. सर्व मुलांनी आणी मुलींनी विद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जडणघडणीत ज्ञानदीप विद्यालयाचा व ज्ञानदीप सेवा मंडळाचा सिंहाचा वाटा आहे असे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. दर्शना भोईर यांनी केले.  हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सर्वांसोबत मिलिंद भोईर, वैभव पाटील, दिपक भोईर,अल्पना मढवी ,यांनी विशेष मेहनत घेतली.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.