-->
आपला महाराष्ट्र 24

वाको महाराष्ट्र सिनियर आणि मास्टर चॅम्पियनशिपमध्ये जासईच्या शुभम म्हात्रेला सुवर्णपदक..!!

उरण (सुनिल ठाकूर ):-बालेवाडी स्टेडियम पुणे येथे ४ जून रोजी पार पडलेल्या वाको महाराष्ट्र सिनियर आणि मास्टर चॅम्पियनशिपमध्ये 2023 च्या राज्यस्तरी स्पर्धेत, रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा, जासई उरण येथील शुभम परशुराम म्हात्रे यांनी किक       लाईट - 69  या प्रकारात सुवर्णपदक आणि क्रिएटिव्ह टीम फार्म या प्रकारात देखील तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला असून ,त्याची पंजाब येथे होणाऱ्या वाको नॅशनल सिनियर चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे .स्पर्धेत 27 जिल्ह्यातील 278 विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते.   रायगड जिल्ह्याचे प्रशिक्षक संतोष मोकल व जीवन सर यांचे शुभम म्हात्रे याला या स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले . दरम्यान मराठी सिंगर खंडेराया झाली माझी दैना या सुप्रसिद्ध गाण्याचे सिंगर आणि कंपोसर वैभव लोंढे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले .तर या स्पर्धेला वाको गुजरातचे प्रेसिडेंट सिद्धार्थ सर, वाको महाराष्ट्र प्रेसिडेंट निलेश शेलार,  आणि वाको महाराष्ट्र टीमचे सर्व सीनियर उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.